तुम्ही कधी हॉप शूट्स भाजी बद्दल ऐकले आहे का? ही भाजी जगातील सगळ्यात महाग भाजी आहे. या भाजीचे उत्पादन जगातील मोजक्या देशांमध्ये घेतले जाते. ह्या भाजीमध्ये बऱ्याच अशा प्रकारच्या औषधी गुणधर्म आहेत. अगोदर जेवणामध्ये चवीसाठी आणि आणि औषधांमध्ये याचा उपयोग व्हायचा.
परंतु कालांतराने या भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु झाल्यानंतर तिचा भाजी म्हणून उपयोग होऊ लागला. सध्याच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये या भाजीचा सगळ्यात जास्त उत्पादन घेतले जाते. भारताचा विचार केला तर बिहार राज्यात याचे उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दल या लेखात माहिती घेऊ
बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी अमरेश सिंह यांनी इंडियुयुन व्हेजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूट वाराणसी येथून या भाजीचे बी आणून ते लावलं. हॉप शूट्स ची लागवड केल्यानंतर हळूहळू तिचे उत्पादन मिळाला लागले.
अमरेश सिंह यांनी सुरुवातीला लागवड केल्यानंतर त्यांना 60 टक्के उत्पादन मिळाले. अमरिश सिंग यांच्या मते बिहार सारख्या गरीब राज्यात या पिकामुळे न शेतकऱ्यांचा नशीब उजळू शकतो असं मत देखील त्यांनी व्यक्त केले.
हॉप शूट्सची किंमत
या भाजीला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहेत. या भाजी ची किंमत ऐकली तर आश्चर्य वाटते. आंतरराष्ट्रीय बाजारात या भाजीचा दर हा एका किलोसाठी 87 हजार रुपये एक लाख रुपये इतका आहे.इटली या देशात वसंत ऋतूमध्ये येणार्या पहिल्या उत्पादनासाठी थेट बोली लावली जाते. प्रति किलो 1000 युरो इतकी बोली लावली जाते. ही भाजी इतकं महाग असण्याचे कारण म्हणजे या भाजीच्या फळांचा, फुलांचा आणि मुळा चा वापर देखील केला जातो. या भाजीचा उपयोग बियर तयार करण्यासाठी आणि मेडिसिन उद्योगांमध्ये अँटिबायोटिक तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. या झाडाच्या मुळांपासून बनवलेली औषधे टीबीच्या उपचारांमध्ये उपयोगी ठरत. टीबी सोबतच कॅन्सरवर देखील ही भाजी खूपच लाभदायक आहे.
कॅन्सर मध्ये वाढणाऱ्या अनियंत्रित पेशींना रोखण्यासाठी हॉप शूट्स खूपच महत्वपूर्ण आहे. तसेच महिलांच्या मासिक पाळी सारखे समस्यांवर देखील फायदेशीर आहे. तसेच चिंता, हायपर ऍक्टिव्हिटी, शरीरावर वेदना होणे, अस्वस्थता, लैंगिक संसर्ग, स्त्रेस, दात दुखी, अल्सर, हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधी रोगांवर देखील हॉप शूट्स लाभदायक आहे. केसांमध्ये असलेल्या कोंड्यावरही उपयुक्त आहे.
Published on: 06 February 2021, 10:28 IST