1. बातम्या

कमी दिवसात तयार होईल बासमती तांदळाचे हे वाण

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पुसा बासमती 16 92

पुसा बासमती 16 92

  खरीप हंगामातील प्रमुख पिक भात असून त्याची रोपवाटिका तयार करण्याचे काम चालू होईल. यावेळी शेतकऱ्यांची नजरही जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होणाऱ्या बासमती वर असते. जर शेतकऱ्यांना कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या तांदळाची जात मिळाली तर शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे असते.  त्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका बासमती तांदूळच्या एका प्रजाती विषयी माहिती देणार आहोत.

पुसा बासमती 16 92

 दर शेतकऱ्यांना कमी कालावधीत जास्त उत्पादन घ्यायचा असेल तर शेतकरी या हंगामात पुसा बासमती 16 92 त्या तांदुळाच्या जातीचा भात पिकाच्या लागवडीसाठी वापर करू शकता.  भारतीय कृषी अनुसंधान संस्था पुसा निदेशक डॉ.  अशोक सिंह यांनी सांगितले की,  या जातीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना प्रति एकर कमीत कमी 27 क्विंटलपर्यंत उत्पन्न होऊ शकते.

 

हे भाताची जातकमी कालावधीत तयार होणारे म्हणजे फक्त एकशे पंधरा दिवसात तयार होते. ही जात लवकर तयार होत असल्याने शेतकऱ्यांना बाकीच्या वेळेत त्याच जमिनीत दुसऱ्या पिकांची लागवड करता येऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडू शकते.  पुसा बासमती 1509 च्या तुलनेत पुसा बासमती 1692 या जातीपासून जवळजवळ पाच  क्विंटल जास्त उत्पादन मिळते. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या तांदूळ हा फुटत नाही.  दिल्ली,  हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या बासमती  जीआय क्षेत्रात या प्रजातीची शिफारस करण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी जात

 पुसा ने या वरायटी ला 2020 मध्ये विकसित केले आहे.हि व्हरायटी एकदम नवीन असल्याकारणाने त्याचे बियाणे मर्यादित प्रमाणात उपलब्ध होईल.  कृषी तज्ञांच्या मते शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न आहे पिकांच्या वाढीवर इतके अवलंबून असते तितकेच जास्त उत्पादन होण्यावर  ही तितकच अवलंबून असते. त्यामुळेच तांदुळाची ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सिद्ध होईल.  यात शंका नाही.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters