News

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अजूनही बराच ऊस शेतात शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे.

Updated on 27 February, 2022 9:56 AM IST

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अजूनही बराच ऊस शेतात शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे.

यामागे प्रमुख कारण म्हणजे यावर्षी राज्यातील ऊस लागवड क्षेत्राचा विचार केला तर दुपटीने वाढ झाली आहे. या बाबतीत साखर कारखान्यांकडून नियोजन केले गेले होते परंतु ते नियोजन चुकताना  दिसत आहे. याबाबतीत साखर आयुक्त कार्यालयाकडून देखील प्रयत्न केले जात असून कुठल्याही प्रकारचा ऊस शिल्लक राहणार नसल्याचे खुद्द साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. परंतु ऊस गाळपाचा कालावधी निघून गेल्याने उसाच्या वजनात 10 ते 15 टक्के घट होणार आहे. यावर्षी कारखान्यांनी विक्रमी गाळप करून सुद्धा अजूनही 15 ते 20 टक्के ऊस हा शेतात शिल्लक आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी  गुऱ्हाळ सुरू केले आहेत.

अशाच काही पर्यायांचा शोध घेणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे.ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नसल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.तसेच त्यात्याकारखाना क्षेत्रातील गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाने बंद करू नये असे पत्रही संचालकांना दिले आहे.त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत गाळप सुरू राहील असा एक अंदाज आहे. परंतु ऊस तोडीचा कालावधी उलटूनही जर तोड झाली नाही तर उसाच्या वजनात 10 टक्के घट येते त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पर्यायांचा शोध घेणे गरजेचे आहे. 

उसाच्या वजनामध्ये घट होणेहे काही  पूर्ण नुकसान असते असे नाही त्यामुळे केवळ दहा टक्के वजन घटते. या वर्षी विक्रमी प्रमाणात गाळप होऊन देखील उसशिल्लक आहे त्यामुळे लागवड दरम्यान चे नियोजन आता करणे फार गरजेचे आहे.

English Summary: this timing of sugercane factory shut but 15 to 20 percent cane crop pending till without cutting
Published on: 27 February 2022, 09:56 IST