पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या सगळ्यात महत्त्वाची आणि यशस्वी ठरलेली योजना आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून थेट वर्ग करण्यात येतात.
आतापर्यंत या योजनेचे अकरा हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले असून लवकरच बाराव्या हप्त्याची तयारी केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा आहे.
परंतु काही फसवणुकीचे घटना म्हणजेच काही शेतकरी अपात्र असतांना देखील शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे शासनाला दिसून आल्याने या योजनेमध्ये बऱ्याच प्रकारचे बदल करण्यात येत आहेत.
परंतु अशा काही गोष्टी आहेत त्यांची काळजी पात्र शेतकऱ्यांना देखील घ्यावी लागणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला ताबडतोब कराव्या लागतील नाहीतर तुम्ही मिळणाऱ्या लाभापासून वंचित होऊ शकतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहू.
नक्की वाचा:PM Kisan Yojana : कामाची बातमी.! 'या' तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे
पी एम किसान साठी शेतकऱ्यांनी करावयाच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी
1- लाभार्थ्याची जन्मतारीख- पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना जन्मतारीख अपडेट करणे गरजेचे आहे. कारण फेब्रुवारी 2001 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल,असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परंतु आतापर्यंत जर अशा शेतकऱ्यांना लाभ मिळाला असेल तर तो आता बंद करण्यात येणार आहे.
2- ई-केवायसी- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. जर तुम्ही ती अद्याप पर्यंत केली नसेल तर येणारा बाराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.
3- जमिनीचे कागदपत्र- तसेच तुम्ही ज्या जमिनीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेत आहात त्या जमिनीचे सगळी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे
कारण प्रत्यक्षात अपात्र लाभार्थी आणि खोटी कागदपत्र तयार करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या ची ओळख पटवण्यासाठी पंचायत आणि ग्रामपंचायती स्तरावर सोशल ऑडिट करण्यात येत आहे.
नक्की वाचा:Car News: शेतकऱ्यांच्या पसंतीच्या 'अल्टो' आता अवतरणार के-10 अवतारात, अल्टो कारचे नवे रूप
Published on: 07 July 2022, 12:35 IST