गेल्या महिनाभरापासून राज्यात कडाक्याची थंडी पडली होती तापमान सुद्धा कमी असल्यामुळे सदैव हवेत गारवा आणि दिवसभर धुके असे वातावरण थंडीमुळे निर्माण झाले होते. यंदा च्या वर्षी प्रत्येक वर्षी पेक्षा थंडी जास्त च होती. परंतु आता उन्हाळ्याची सुरवात होऊ लागली आहे. आता सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. तसेच हळूहळू राज्यातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. आणि वातावरणात सुद्धा बदल होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील तापमान हे 35 अंशावर पोहचले:
सध्या विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे विदर्भात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 30 ते 35 अंशावर गेल्यामुळे रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसभर उन्हाचे चटके अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे या जिल्ह्यातील तापमान हे 35 अंशावर पोहचले आहे.उन्हाळ्याचा पारा वाढण्यास सुरुवात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात भयंकर कडाक्याची थंडी पडली होती. त्याचबरोबर अनेक नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस इत्यादी चालूच होते. आता पर्यंत पडलेल्या थंडी पैकी सर्वात कडाक्याची थंडी यंदाच्या वर्षी राज्यात पडली होती. या काळात शेतकरी वर्गाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. थंडीमुळे आणि धुक्यांमुळे पिकांवर रोगराई आणि कीड चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.
परंतु सध्या गेल्या 4 दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर कमी येत असल्याचे जाणवत आहे. रात्रभर थंडी आणि दिवसभर उन्हाचे चटके लोकांना लागत आहेत. सध्या राज्यातील वाशीम जिल्ह्यात उन्हाळी तगपमान हे 35 अंशावर नोंदीवले गेले असल्यामुळे यंदा च्या वर्षी उन्हाळा कडकडीत पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सध्या राज्यातील अमरावती जिल्ह्यामधील कमाल तापमान हे 31.8 तर किमान तापमान 14.0 अंशावर एवढे नोंदवले गेले आहे. त्याचप्रमाणे अकोला जिल्हा-अधिकतम तापमान हे कमाल 33.0 आणि किमान तापमान हे -14.6 अंशावर नोंदवले आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात नोंदवले गेलेले तापमान हे कमाल-31.4 आणि किमान 14.0 अंशावर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान कमाल 31.0 आणि किमान 17.0 अंशावर गोंदिया जिल्ह्यातील कमाल तापमान 29.6 आणि किमान तापमान 12.6 अंशावर आहे. सध्या राज्यातील तापमान हळूहळू वाढू लागले आहे तसेच यंदाचा उन्हाळा हा जास्त जाचक आणि कडकडीत जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वाढत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करणे सुद्धा आवश्यक आहे यंदा बक्कळ झालेल्या पावसामुळे यंदा चा उन्हाळा बळीराजाला सुखाने जाईल अशी आशा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत.
Published on: 05 February 2022, 04:47 IST