यंदाचा ऊस गाळप हंगामात राज्यातील जवळजवळ 187 कारखाने सुरू आहेत. त्यापैकी 67 कारखान्यांनी झालेल्या कराराप्रमाणे एफ आर पी नुसार ऊस उत्पादकांचे पैसे निर्धारित वेळेत अदाकेले असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील जवळजवळ सात साखर कारखान्यांचा समावेश आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील साखर आयुक्त कार्यालयाने 15 जानेवारीपर्यंत ज्याउसाचे गाळप झाले आहे त्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या नावे वर्ग करणाऱ्या कारखान्यांची वर्गवारी केली होती म्हणजे हिरवा, पिवळा,नारंगी आणि लाल रंगात विभागणी करण्यात आली होती.
यावर्षी राज्यांमध्ये सहकारी व खाजगी असे मिळून 187 कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यापैकी 67 कारखान्यांनी या एफआरपी अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम उत्पादकांना दिली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातीलसात कारखान्यांचा समावेश आहे. ते म्हणजे निनाई,जत, सोनहिरा, विश्वास, क्रांती,आरग,उदगिरी या कारखान्याचा समावेश आहे.
यामध्ये दुसऱ्या श्रेणीत एकतीस कारखाने असून या दुसऱ्या श्रेणीतील कारखान्यांनी उसाची बिले 80% वरअदाकेलीआहेत. तर तिसऱ्या श्रेणीतील कारखान्यांनी 60 टक्क्यावर देयके अदा केले आहेत.या तिसऱ्या श्रेणीत 34 कारखाने आहेत.तर धोकादायक श्रेणीमध्ये पंचावन्न कारखाने आहेत.(स्त्रोत-लोकसत्ता)
Published on: 22 January 2022, 06:48 IST