News

सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहेत. जर आपण खरीप हंगामाचा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खरिपामध्ये महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जातात.

Updated on 21 May, 2022 10:38 PM IST

 सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहेत. जर आपण खरीप हंगामाचा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खरिपामध्ये महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जातात.

महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्येपावसाचे प्रमाण वेगवेगळे असतेव त्या दृष्टिकोनातून शेतकरीसोयाबीन पिकांच्या जातींची निवड करतात. मागच्या वर्षी आपणपाहिले की पाऊस जास्त झाल्यामुळेसोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले.

अशा जास्त पावसाचा परिस्थिती टिकाव धरू शकणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना मिळाले तर?  खूपच फायदा यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्येलागवड क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता खूपच कमी असल्यामुळे ती वाढावी यासाठी विशेष कृती योजनेसाठीतीन वर्षात कोट्यवधींचा निधी देण्याची मान्यता मंत्रिमंडळात दिली आहे.या लेखांमध्ये आपण सोयाबीनच्या जास्त पावसात टिकाव धरू शकणाऱ्या काही जातींची माहिती घेणार आहोत.

 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सोयाबीनच्या विविध जाती

1-JS-9305-या सोयाबीनच्या जातीची शिफारस महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. ही जात अधिक उत्पादनासाठी उपयुक्त असून रोग व किडीस कमी बळी पडते व या वाणाची एक खास ओळख आहे.

2-KDS-344( फुले अग्रणी)- हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केले असून या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीने सर्वात उत्कृष्ट असे हेवान असून या वाणाच्या शेंगा गळत नसल्याने उत्पादन वाढीस उपयुक्त आहे.

3-JS-9705- या सोयाबीनच्या वाणाची शिफारस महाराष्ट्रासाठी करण्यात आली असून लागवडीपासून 70 ते 75 दिवसांत पक्व होते. एकरी उत्पादनाचा विचार केला तर तुलनेमध्ये अधिक उत्पादन देते तसेच या वाणाचेमहत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अवर्षण व जास्त पाऊस या परिस्थितीत सुद्धा हेवान चांगले येते.

4- फुले संगम 726- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे वान एकरी जास्त उत्पादन देते तसेच काढणीच्या वेळेस शेंगा फुटत नसल्याने उत्पादन चांगले मिळते. तसेच रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही.

5-MAUS-612- दर्जेदार बियाणे असलेले हे वाण असून इतर जातींच्या तुलनेत एकरी उत्पादन जास्त येते. या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले उत्पादन देण्याची क्षमता ठेवते.

6-MAUS-162- सोयाबीनचे हे वाण एकरी अधिक उत्पादन देते व वाढताना सरळ व उंच वाढते. सोयाबीनच्या काढणी यंत्राने  काढणीसाठी हेवान खूप उपयुक्त म्हणून याची ओळख आहे.

7-DS-228( फुले कल्याणी)- हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे संशोधित वाण आहे. या वाणाचे उत्पादन क्षमता अधिक असून ज्या ठिकाणी पाण्याची सोय चांगली आहे अशा ठिकाणी पेरणीसाठी हे वाण उपयुक्त असून ते उशिरा येणारे वाण आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:मुळशी तालुक्यात इंद्रायणी भातासाठी दर्जदार बियाणे उपलब्ध,का आहे जगभरात मागणी वाचा सविस्तर

नक्की वाचा:लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, खरेदीला गेलं की ५० ला एक, कसा घालायचा मेळ

नक्की वाचा:Farming Business Idea: ‘याफुलाची शेती शेतकऱ्यांना मिळवून देणार अधिकचे उत्पन्न; वाचा याविषयी सविस्तर

English Summary: this soyabioen veriety is so profitable and give more production to farmer
Published on: 21 May 2022, 10:38 IST