News

जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिक्विंटल ३५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ४०० रुपये जमा करावेत. तसेच १३ सप्टेंबरच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव येथे आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते.

Updated on 08 September, 2023 4:05 PM IST

जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिक्विंटल ३५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ४०० रुपये जमा करावेत. तसेच १३ सप्टेंबरच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव येथे आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, यंदा पाऊस कमी झाल्याने एकरी दहा ते बारा टनाने उत्पादन घटणार आहे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने जेमतेम तीन महिने चालतील. कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी होणार आहे. त्याशिवाय कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हा शेतकऱ्यांना लाभदायक होणार आहे.

उस दर निश्चित झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास पाठवण्यास घाई करू नये, १३ सप्टेंबरला कोल्हापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रसह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभ मिळविण्यासाठी या सोप्या पद्धती जाणून घ्या..

कृषी आयोगाच्या शिफारशीनुसार कारखान्यात उत्पादित होणारे इथेनॉल, ट्रान्स्पोर्ट, वीजनिर्मिती या अंदाजावरून कारखान्यांनी एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, असे होत नसल्याने ऊस उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे, असेही खासदार राजू शेट्टी म्हणाले.

ब्रोकली लागवडीमुळे शेतकऱ्यांना मिळणार चांगला नफा, कमी कालावधीत मिळेल चांगले उत्पादन..

बेळगाव जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने एफआरपीप्रमाणे दर टाळाटाळ करीत आहे. याबाबत साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिक्विंटल ३५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ४०० रुपये जमा करावेत.

शेतकऱ्यांनो या पद्धतींचा अवलंब करून शेतातील जमिनीत ओलावा टिकवून ठेवा, जाणून घ्या..

English Summary: This season is beneficial, only farmers should not rush to send for sugarcane, Raju Shetty appeals to farmers...
Published on: 08 September 2023, 04:05 IST