News

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये यावर्षी शेतकरी आंदोलनाचा चांगलाच मुद्दा गाजला होता. केंद्र सरकारने जे तीन कृषी कायदे केले होते त्या कायद्याला विरोध करत केंद्र सरकारच्या विरोधात अनेक शेतकरी संघटनांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेत एकत्र निवडणूक लढवायचे ठरवले. सयुंक्त समाज मोर्चाच्या बॅनरखाली २२ शेतकरी संघटनांनी एकत्र होऊन निवडणुका लढवल्या आहेत. परंतु निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा गुरुवारी निकाल जाहीर होत असताना सयुंक्त समाज मोर्चाला झटका बसू शकतो.

Updated on 10 March, 2022 4:34 PM IST

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये यावर्षी शेतकरी आंदोलनाचा चांगलाच मुद्दा गाजला होता. केंद्र सरकारने जे तीन कृषी कायदे केले होते त्या कायद्याला विरोध करत केंद्र सरकारच्या विरोधात अनेक शेतकरी संघटनांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेत एकत्र निवडणूक लढवायचे ठरवले. सयुंक्त समाज मोर्चाच्या बॅनरखाली २२ शेतकरी संघटनांनी एकत्र होऊन निवडणुका लढवल्या आहेत. परंतु निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा गुरुवारी निकाल जाहीर होत असताना सयुंक्त समाज मोर्चाला झटका बसू शकतो.

संयुक्त समाज मोर्चाचा पराभव का होऊ शकतो?

1. रॅलींमध्ये गर्दीचा अभाव :-

ज्यावेळी शेतकरी आंदोलन सुरू झाले त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र येऊन त्यांचा जमाव दिसत होता. जे की दिल्ली व इतर अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांनी गर्दी केली होती. मात्र बलबीर सिंग राजेवाल सारख्या नेत्यांनी त्यांच्या निवडणूक रॅलींमध्ये कमी संख्या असल्यामुळे तेथील नागरिकांना आकर्षित करू शकले नाहीत तसेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बलबीर सिंग राजेवाल यांच्या सभेला जास्त गर्दी सुद्धा न्हवती त्यामुळे विरोधकांनी त्यांची खिल्ली च उडवली.

2. राजकारणाचा अनुभव नसणे :-

संयुक्त समाज मोर्चाने याआधी कधी निवडणूक लढवली न्हवती त्यामुळे त्यांना याबद्धल कसला अनुभव न्हवता. तसेच प्रचारासाठी पुरेशी संसाधने सुद्धा नव्हती. किसान संघाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांच्या मुलाखतीमध्ये निवडणुकीत पराभावासाठी कमी संसाधने तसेच भ्रष्टाचाराला जबाबदार धरले आहे. ज्यावेळी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी सांगितले की हा माझ्यासाठी पहिला अनुभव आहे, मात्र मी निवडणूक यासाठी लढतोय कारण की राजकारण अगदी खालच्या पातळीनुसार चालू आहे.

3. शेतकरी संघटनांकडे कॅडर मताचा अभाव :-

सयुंक्त समाज मोर्चाचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्यांच्याकडे काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाची कॅडर व्होट बँक नव्हती. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती मात्र त्यांना खात्री होती की शेतकरी समर्थक भांडवल करू शकतील.

4. शेतकरी संघटनांमध्ये दुफळी :-

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावरून शेतकरी संघटनेत फूट पडली जे की कृषी कायदा विरोधात जे ३१ किसान संघ आले होते त्यामधील फक्त २२ किसान संघटनांनी निवडणूक लढवली आहे. एकमत झाले नसल्यामुळे चुकीचा संदेश पसरला व बलबीर राजेवाल आणि जोगिंदरसिंग उग्रहान या दोन व्यक्तींच्या नेतृत्वाखाली गट विभागले गेले. जोगिंदरसिंग उग्रहान यांचे असे मत होते की राजकारणात सामील झाले तर सरकार विरोधी त्यांचा लढा खाली पडेल.

पंजाब विधानसभा निवडणूक निकाल :-

२० फेब्रुवारी २०२२ रोजी जे पंजाब विधानसभा निवडणूकसाठी जे मतदान घेण्यात आले त्याचा आज म्हणजे १० मार्च ला निकाल लागला आहे. जे की पंजाब मध्ये आम आदमी पार्टी चा विजय झाला असून ९१ सीट आलेल्या आहेत तर काँग्रेस च्या १८, अकाली दल ६, भारतीय जनता पार्टी २ आणि अन्य १ अशा रीतीने निवडणूक पार पडली असून पंजाब मध्ये आम आदमी पार्टी निवडणून आलेली आहे.

English Summary: This result was due to Kisan Morcha in Punjab and Punjab election results, read in detail
Published on: 10 March 2022, 04:34 IST