चवदार स्वंयपाक करण्यासाठी आपण घरात बनवलेला मसाला भाजीसाठी वापरत असतो. या मसाल्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लंवग. लंवग स्वंयपाक घराप्रमाणेच धार्मिक कामात पुढे असतो. याशिवाय लंवग आरोग्यसाठी ही फायदेशीर असते. आज आपण याच लंवगाच्या शेतीविषयी जाणून घेणार आहोत. मसाल्याच्या पदार्थात महत्त्वाचं स्थान मिळवणाऱ्या लवंगाला पुजाविधीतही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. तंत्र मंत्रासाठी याचा उपयोग केला जातो. लवंगाला ऊर्जावाहक मानले जाते.
सनातन धर्माचे लोक लवंगाचा धार्मिक कामात अधिक वापर करत असतात. परंतु याला याची कोणतीच पुष्टी कृषी जागरण करत नाही. याला वैदिक आधार नाही आहे, पण लोक परंपरांनुसार याचा वापर करत आहेत. घरात नकारात्मकता असेल तर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. दरम्यान भारतात लंवगाची शेती साधरण प्रत्येक राज्यात केली जाते. परंतु या शेतीसाठी वालुकामय जमीन अधिक उपयुक्त असते. लवंगची शेती उष्णकटिबंधीय वातावरणात केली जाते. लवंगाचे रोपे अधिक ऊन किंवा अधिक गारवा म्हणजे थंडी सहन करु शकत नाहीत. चांगले उत्पन्न घ्यायचे असल्यास याची शेती पावसाळ्यात करावी. लवंगाच्या शेतीसाठी सावली असावी लागते. अधिक ऊनचा सामना या रोपांना करावा लागणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसं तर उन्हाळ्यात ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास ह्या पिकांला काहीच अडचण नाही. पाणीला पकडून ठेवणाऱ्या जमिनीत लवंगची शेती करता येत नाही.
लावगवडीचा पद्धत
लवंग लावण्याआधी लवंगच्या बियाणांना रात्रभर पाण्यात भिजू घालावे लागतात. लावताना शेंगा काढू टाकावेत. लवंगची लागवड मॉन्सूनच्या वेळेस केले जाते. रोपांची लागवड करण्याचा काळ हा जून ते जुलै आहे. रोपांच्या लागवडीसाठी ७५ सेंटिमीटर लांबी आणि रुंदीचा खड्डा करावा. दोन खड्ड्यात साधरण ६ ते ७ सेंटिमीटरचं अंतर असावं...
सिंचन
या पिकाच्या गरजेनुसार पाणी दिले जाते. जर उन्हाळ्यात याची लागवड केली असेल तर पाणी वारंवार द्यावे. लवंगच्या झाडापासून साधारण ४ ते ५ वर्षात फळ प्राप्त होत असते. लवंगचे फळ हे झाडांवर गुच्छांप्रमाणे लागते. याचा रंग हा गुलाबी असतो. या फुलांना फुलण्याआधीच तोडले जाते. या फळांची लांबी दोन सेंटिमीटर होत असते.
Published on: 15 April 2020, 03:59 IST