Maharashtra Politics: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर घणाघात केला. शेतकऱ्यांचा पैसा राजकारणात वापरला जात असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
संघर्ष केल्या शिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. शेतकऱ्यानं लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
हेही वाचा: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, भविष्य निर्वाह निधीबाबत नवीन अपडेट जारी, नियम बदलले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यावेळी म्हणाले, दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्याला संघर्ष करावाच लागतो. राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. यावरूनच या सरकारची नितीमत्ता दिसून येत आहे. सरकार देखील शेतकऱ्यांप्रती विरोधकांप्रमाणे वागतेय असा घणाघात शेट्टी यांनी केला आहे.
हेही वाचा: जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर करा या पिकाची शेती; तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या
1. दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एक रकमी करावे.
2. काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करावेत. मागील वर्षाची एफआरपी + 200 रूपये तातडीने द्यावेत.
3. सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत.
4. गतवर्षीच्या सरासरी रिकव्हरीनुसार चालू हंगामात एक रक्कमी एफआरपी आणि हंगाम संपल्यानंतर 350 रूपये उचल द्यावी.
5. तोडणी मशिनने तुटलेल्या ऊसाला पालापाचोळ्याची कपात 4.50 टक्याऐवजी 1.50 टक्के करावी.
6. आदी मागण्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केल्या आहेत.
Published on: 08 November 2022, 10:11 IST