जीवन तरूण पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड प्लान आहे:
आज आम्ही आपल्याला जीवन तरूण पॉलिसी बद्दल माहिती देत आहोत. ही पॉलिसी मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून तैयार केली आहे. नॉन-लिंक्ड प्लान अर्थात या प्लानचा शेयर मार्कटमध्ये उतार व चढाव शी काहीही संबंध नाही. हा एक प्रोफिट प्लान आहे याचा अर्थ एलआयसी आपल्या फायद्यासाठी पॉलिसीधारका सोबत शेयर करेल. हा एक लिमिटेड प्रीमियम पेमेंट प्लान आहे ज्यामध्ये पॉलिसी कालावधी पासुन पाच वर्ष पर्यंत पॉलिसी पेमेंट भरावा लागतो.
किती वर्षाच्या मुलांसाठी हा प्लान घेऊ शकतो:
भारत जीवन विमा निगम एलआयसी मध्ये जीवन तरूण पॉलिसी खुप मददगार होऊ शकते. ही पाॅलिसी एक मनी बैंक पॉलिसी प्रमाणे आहे ही आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसाची गरज पुर्ण करते. पॉलिसी 90 दिवसापासुन ते 12 वर्ष च्या मुलासाठी घेता येऊ शकता. जर कोणी जन्मत: बाळासाठी हा प्लान घेतात तर त्यांना खुप फायदा मिळतो.
130 रूपये दररोज भरल्यावर 25 लाख रूपये मिळतील:
यामध्ये मिनीमम सम एश्योर्ड 75000 रूपये आहे. यानंतर आपल्याला अनेक फायदे दिले जातील. या पॉलिसीमध्ये जर आपण दररोज 130 रूपये गुंतवणुक तर आपल्याला 25 लाख रूपये मिळतील. तर या पॉलिसी मध्ये 25 वर्ष पुर्ण झाल्यावर म्हणजे मेच्योर झाल्यावर पॉलिसीधारकाला 25 लाख रूपये मिळतील. उदाहरणत: एखादी व्यक्ती पॉलिसीधारक एक वर्षाचा असताना ह्या प्लानमध्ये गुंतवणुक करेल व दररोज 130 रूपये प्रति दिवस प्रीमियम भरेल तर 100% एसए + बोनस + एफएबी सोबत एकुण 2502000 रूपये रिटर्न मिळतील.या पॉलिसी मध्ये गुंतवणुकचा कालावधी 20 वर्ष पर्यंत असते.
योजनेसाठी आवश्यक अटी:
मिनिमम सम एश्योर्ड 75000 रूपये आहे मैक्सिमम सम एश्योर्ड साठी अट नाही. मैच्योरिटी कालावधी 25 वर्षाचा आहे. प्लानच्या सुरूवातीला कमीत कमी 90 दिवस पुर्ण असणे आवश्यक आहे तरी सुरूवातीला वय 12 वर्ष, व त्याचबरोबर पुर्ण परिपक्वता कालावधी 25 वर्ष राहील. पॉलिसी चा कालावधी सुरूवातीला 25 वर्ष आहे. तरी प्रीमियम भरावयाचा कालावधी 20 वर्ष आहे.
डेथ बेनिफिट्स सोबत सर्वाइवल बेनिफिट मिळेल:
जोखमीच्या कालावधीच्या अगोदर मृत्यु झाला तर एकुण रकमेतुन टैक्स, अतिरिक्त प्रीमियम, संशोधित प्रीमियम हे सर्व मिळून एकुण रक्कम दिली जाते. जोखिम कालावधी नंतर मृत्यु झाल्यास यासाठी मृत्युची वेळेपर्यंत एकुण रक्कम, बोनस, अतिरिक्त बोनस हे सर्व दिले जातात. आपली एकुण रकमेमधुन काही स्थितिक दर वर्षाला सर्वाइवल बेनिफिट च्या रूपाने मिळतो. पॉलिसीला एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर दर वर्षाला मिळत असतो. हे 20 वर्षापर्यंत मिळतो व त्यानंतर सुध्दा 4 वर्ष मिळत असतो. हे आपल्या प्लानवर अवलंबुन असते की आपली रक्कम किती आहे व कोणता प्लान घेतलेला आहे.
Published on: 25 November 2020, 12:38 IST