नाशिक: शेती आणि रासायनिक खते यांचा एक घनिष्ठ संबंध असून पिक उत्पादन वाढीचे दृष्टिकोनातून रासायनिक खते खूप महत्त्वपूर्ण आहेत. परंतु खतांच्या किमती देखील बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडण्याची काम होत आहे.
याच सगळ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल अशी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे कोरोमंडल इंटरनेशनल लिमिटेड आणि स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपन्यांनी आपल्या काही ग्रेडच्या अनुदानित खताच्या किमती कमी केले असून संबंधित खत विक्रेत्यांनी बदल झालेल्या किमती प्रमाणेच खतांची विक्री करावी.
नक्की वाचा:पिक लागवड:अवघ्या 4 महिन्यात कमवू शकता 2 लाख रुपये, 'या' पिकाची लागवड ठरेल टर्निंग पॉइंट
जर जास्तीच्या दराने विक्री करताना कोणीही आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांनी नवीन सुधारित दर आहेत त्या दरानुसार या खतांची विक्री करावी असे देखील आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.
एवढेच नाहीतर महाधन या शासकीय खतनिर्मिती कंपनीने देखील सर्व एनपी आणि एनपीके खतांच्या किमती मध्ये सुधारणा केली असून हे दर एक जुलै पासून लागू करण्यात आले आहेत. या नवीन दराप्रमाणे विक्रेत्यांनी खतांची विक्री करावी, असेदेखील आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.
नक्की वाचा:Farming Idea:एकदा लावा गुलाब आणि कमवा दहा वर्ष,गुलाबा पासून बनतात 'ही'उत्पादने
जर शेतकऱ्यांची तक्रार आली तर होणार कारवाई
जर ही खत विक्रेते आहेत त्यांनी नवीन दरांमध्ये झालेल्या बदला प्रमाणेच खतांची विक्री करावी. यासाठी ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने संबंधितांना सूचना देण्यात यावी.
जादा दराने खत विक्री होत असेल तर यासंबंधी तक्रार आल्यास किंवा कृषी विभागाच्या तपासणीत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे
1- कोरोमंडलने किंमत कमी केलेली खते-24:24:00,14:35:14 आणि 20:20:00
2- स्मार्टकेम कंपनीने किंमत कमी केलेली खते-24:24:00,8:21:21,9:24:24 या अनुदानित ग्रेडच्या खतांच्या किमती गोणी व छापील किमतीपेक्षा कमी केले आहेत.
Published on: 11 July 2022, 06:26 IST