News

यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने महत्वाचा असलेला खरीप हंगाम पाण्यात गेला.त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेले सोयाबीन उत्पादकता मराठवाड्यात एकरी सात ते आठ क्विंटल असते.

Updated on 15 January, 2022 11:13 AM IST

 यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने महत्वाचा असलेला खरीप हंगाम पाण्यात गेला.त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेले सोयाबीन उत्पादकता मराठवाड्यात एकरी सात ते आठ क्विंटल असते.

परंतु अगदी शेंगा लागल्यापासून ते पीक काढणीपर्यंतचेसगळे टप्पे पाण्यात गेले व त्यामुळे उत्पादकतेत घटआली. इतकेच नाही तर सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर दरांमध्ये देखील घट झाली. जी परिस्थिती सोयाबीनची झाली तीच परिस्थिती तुरीची आणि कापसाचे देखील झाली. परंतु या वर्षी शेतकऱ्यांची घेतलेली भूमिका आपली बाजारपेठ यांचे बदलते स्वरूप त्यामुळे या तीनही पिकांना बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे.

 असे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना सांगितले आहे.

 या दरवाढी मागे शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची…..

 शेतकऱ्यांचा कल असा असतो की खरिपातील पिकांची काढणी झाले की त्याची थेट बाजारपेठ विक्री ही शेतकऱ्यांची ठरलेले असते. परंतु यावर्षी बाजारपेठेचे अर्थकारण गणितच शेतकऱ्यांना व्यवस्थित समजल्यामुळे मालाला योग्य भाव मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूकअशी भूमिका संपूर्ण हंगामात घेतली गेली. शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन साठीच नाही तर कापूस आणि तुरीच्याबाबतीतही हीच भूमिका कायम ठेवली. 

त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत आहे. जोपर्यंत मालाला  अपेक्षित भाव मिळत नाही तोपर्यंत धान्याची साठवणूक  करायचे असे शेतकऱ्यांनी  ठरवले होते. नाफडे ने तुरीचे हमीभाव केंद्र सुरू केल्यानंतर खुल्या बाजारात तुरीला हमी भावापेक्षा जास्त भाव खुल्या बाजारात मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापूस या प्रमाणे शेतकऱ्यांनी तूर बाबत घेतलेला निर्णय फायद्याचा ठरणार आहे.

English Summary: this is the important crop dicrease in production but give support to farmer
Published on: 15 January 2022, 11:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)