News

राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रथम स्थानी ठेवून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबिवण्यात आलेला आहे जे की या प्रकल्पातून जी प्रमुख पिके आहेत त्या पिकांच्या स्पर्धाक्षम तसेच त्यांची समावेशक साखळी विकसित करण्यात येत आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग व अमेरिकेचा जो कृषी विभाग आहे यांच्यामध्ये कृषीमंत्री दादा भुसे तसेच राज्याचे मंत्री डॉ. विश्वजीत कदम या दोघांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्यपणे एक करार करण्यात आलेला आहे.

Updated on 12 March, 2022 11:43 AM IST

निश्चित अशी बाजार व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न :-

महाराष्ट्र राज्यातील कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषी विभाग या दोन्ही विभागात तांत्रीक सहकार्यसाठी हा करार करण्यात आलेला आहे. त्याबेली कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की या कराराच्याद्वारे कृषी क्षेत्राचा विकास तसेच शेतकऱ्यांचे कल्याणकारी धोरण राबिवण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात विकेल तेच पिकेल या अभियानातून पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले गेले आहे. जे की शेतकऱ्याच्या शेतमालाची निश्चित अशी बाजारसमितीची व्यवस्था निर्माण केली गेली आहे.

अमेरिकेचा कृषी विभाग तांत्रिक सहकार्य करणार :-

जागतिक बँकेच्या आर्थिक सहायता माध्यमातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात आला आहे जे की या प्रकल्पाच्या माध्यमातून जी प्रमुख पिके आहेत त्याच्या स्पर्धाक्षम तसेच सर्व समावेशक मुल्यसाखळ्यांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेचा कृषी विभाग आपणास तांत्रिक सहकार्य करणार आहे. या कराराच्या माध्यमातून राज्याच्या कृषी विभागाची बांधणी करण्यात येईल तसेच कृषी पणन आणि बाजार समितीची बांधणी चे काम करता येईल असे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.

अमेरिकेच्या कृषि विभागाचा भारतातील राज्य सरकार सोबतचा पहिला करार :-

अमरिकेचे वाणिज्य दूत डेविड रांझ यांनी सांगितले आहे की आज जो करार करण्यात आला आहे हा सामंजस्य करार असून अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारताच्या कृषी विभागाशी पहिला करार आहे. कृषी क्षेत्रात अमेरिका देशाचे मोलाचे स्थान असून जागतिक अन्नसुरक्षा आणि कापूस व इंधनाची वाढती मागणी या क्षेत्रांमध्ये एकत्रपणे काम करण्याचा वाव मिळणार आहे.महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आपले प्रास्ताविक केले जे की यावेळी अमेरिकेचे वाणिज्य विभागातील दूत कृषी तज्ञ लॅझारो सँडवाल, ध्रुव सूद, श्रीमती सुमेधा रायकर-म्हात्रे तसेच कृषी विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर, सहसचिव श्रीकांत आंडगे आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, या दरम्यान उपस्थित होते.

English Summary: This is the first agreement between the US Department of Agriculture and the Department of Agriculture in the state of Maharashtra
Published on: 12 March 2022, 11:43 IST