News

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान तसेच पिकांच्या जाती व उत्पादनवाढीसाठी कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

Updated on 07 February, 2022 2:31 PM IST

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान तसेच पिकांच्या जाती व उत्पादनवाढीसाठी कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

कृषी विज्ञान केंद्रे हे कायम नवनवीन संशोधन शेतीमध्ये एक नवे पर्व आणण्याच्या प्रयत्नात असतात. असाच एक  प्रयोग बारामती कृषी विज्ञान केंद्राने केला आहे. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 बारामती कृषी विज्ञान केंद्राचा प्रयोग

 बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये स्कॉच बोनेट या मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मिरचीची सगळी वाढ ही होमिओपॅथिक औषधे वापरून करण्यात आली आहे. आजपर्यंत होमिओपॅथी औषधांचा वापर पहिला तर केवळ वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे. विशेष म्हणजे हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. स्कॉच बोनेट या मिरचीचा वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे या मिरचीचा  असलेला तिखटपणा नव्हे तर ही मिरची चवीला तिखट नसून गोड आहे.

यावर्षीच्या पूर्ण वाढीसाठी आणि फवारणी साठी होमिओपॅथिक औषधांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत तीन पटीने कमी आहे. कधी न ऐकलेली होमिओपॅथीचा वापर करून केलेली शेती आता बारामतीत करण्यात येत आहे व एवढेच नाही तर ती यशस्वी देखील होत आहे. महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदाच बारामतीत नेदरलॅंडची स्कॉच बोनेट या जातीची गोड मिरची आणि ढोबळी मिरची होमिओपॅथी औषधावर उत्पादीत करण्यात आली आहे. बारामती येथील शारदा नगर येथील कृषी विज्ञान केंद्रात ही विविध रंगाची मिरची लक्ष वेधणारे ठरले आहे.

होमिओपॅथी औषधांच्या आधाराने केवळ वीस हजार रुपयांमध्ये  मिरचीचे उत्पादन करणे शक्य झाले आहे. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या तंत्रज्ञान सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना होमिओपॅथी सोबतच विविध प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.

English Summary: this is new experiment in baramati krushi vvidnyan kendra on chilli
Published on: 07 February 2022, 02:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)