Pm Kisan Update :- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असून आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात आलेले आहेत. आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या योजनेत काही गैरप्रकार आढळून आल्यामुळे सरकारने या योजनेच्या संबंधित असलेले काही नियम कठोर केल्यामुळे अनेक पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढले. जर महाराष्ट्राचा विचार केला तर या अगोदर राज्यांमध्ये तब्बल 97 लाख शेतकरी या योजनेकरिता पात्र होते.
परंतु यापैकी 85 लाख शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळाला. पैकी बारा लाख शेतकरी पात्र असून देखील त्यांना भूमी अभिलेख नोंदी अपडेट नसणे तसेच इ केवायसी नसणे आणि महत्त्वाचे म्हणजे बँक खात्याशी आधार संलग्न नसणे या कारणांमुळे हा लाभ मिळू शकला नाही. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून याकरिता विशेष मोहीम सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे.
15 ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम
ज्या पात्र शेतकऱ्यांना भूमी अभिलेख नोंदणी अपडेट नसणे, इ केवायसी नसणे तसेच बँक खाते आधार लिंक नसणे इत्यादी कारणांमुळे राज्यामध्ये बारा लाख शेतकऱ्यांना पात्र असून देखील चौदावा हप्ता मिळू शकला नाही. याकरिता आता जे शेतकरी यामुळे वंचित राहिले त्यांना या हप्त्याचा लाभ मिळावा याकरिता 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
या मोहिमेमध्ये आता तालुकास्तरावर तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी आणि कृषी अधिकारी यांची एक सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या माध्यमातून आता गाव पातळीवर तलाठी, कृषी सेवक आणि ग्रामसेवक हे वरील तीन अटीमुळे जे शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत
अशा शेतकऱ्यांचा शोध घेऊन या तीनही अटीची पूर्तता करायची आहे असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले. महत्वाचे म्हणजे राज्य शासनाच्या वतीने जो काही नमो किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्या अगोदर पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांच्या सर्व आवश्यक अटींची पूर्तता करण्याचे काम केले जाणार आहे.
जेणेकरून या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नयेत हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जे पात्र शेतकरी या तीन कारणांमुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले त्यांनी सनियंत्रण समितीशी संपर्क करून अटींची पूर्तता करून घ्यावी असे आव्हान देखील कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी केले.
Published on: 13 August 2023, 10:24 IST