शासनाने केलेल्या घोषणा आणि त्या गोष्टींचे प्रभावी अंमलबजावणी या गोष्टींना विविध क्षेत्रात तेवढेच महत्त्व आहे. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले' या उक्तीनुसार केलेली घोषणा आणि त्या घोषणेची अंमलबजावणी घोषणेनुरूप होणे आवश्यक असते.
परंतु तसे होताना बऱ्याच अंशी दिसत नाही. हीच गोष्ट कृषी क्षेत्रासाठी सुद्धा लागू होते. कृषी क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या योजनांची घोषणा शासनातर्फे केल्याजातात व या घोषणांची अंमलबजावणी अगदी वेळेत व्हावी हा सरकारचा उद्देश असतो. त्यासाठी बर्याच अंशी धोरणांमध्ये देखील बदल केले जातात. परंतु प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबतीत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक कर्जाचा जर विचार केला तर येणाऱ्या खरीप हंगामासाठी पीककर्ज शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या अगोदरच मिळावे अशा आशयाच्या सूचना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
परंतु मे महिना सुरू झाला आणखी एक महिन्यात पावसाळा सुरू होईल. परंतु शेतकर्यांना पीककर्ज तर सोडाच परंतु पीककर्जासाठी केलेले प्रस्ताव देखील बँकांकडून स्विकारले जात नाहीत. ही एक स्थानिक पातळीवरची मोठी शोकांतिका आहे. पिक कर्जहे शेतकऱ्याचा एक मोठा आधारस्तंभ मानले जाते. हंगामाच्या सुरवातीला पीककर्ज शेतकऱ्यांना मिळाल्यास पेरणीपूर्व मशागत, बी-बियाणे इत्यादीसाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा उपलब्ध होतो. परंतु वेळेला पिक कर्ज बँकांकडे दाखल केलेला प्रस्ताव देखील स्वीकारला जात नसल्याने सरकारचे खरीप हंगामापूर्वी कर्ज वाटपाचे उद्देश या प्रकारामुळे पूर्ण होईल का? हा देखील मोठा प्रश्न आहे. खरीप हंगामात जिल्हा नुसार उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेतवही उद्दिष्टे जून पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.मे महिना उजाडला तरी देखील पिक कर्ज वाटपाचा श्रीगणेशा झालेला नाही. सध्या खरीप हंगामाच्या जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडत आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना करीत आहेत. परंतु बँकांकडून पीककर्ज वाटपाचे टाळाटाळ सुरू आहे.
साधे प्रस्ताव देखील दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळात शोधावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेती विषयी थोडे काही पण अत्यंत महत्त्वाचे कानमंत्र
नक्की वाचा:अकोला कृषि विद्यापीठाची आणखी एक आनंदी बातमी, राष्ट्रीय पातळीवर सातत्यपूर्ण कामगिरी
Published on: 02 May 2022, 09:11 IST