आपल्या शरीरासाठी बाजरी किती महत्वाची आहे हे समजल्यापासून बाजारातही बाजरी ची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. बाजरी हे पीक आपल्या रोजच्या आहारामध्ये वापरले जाणारे पीक आहे. बाजरीची हलक्या जमिनीत केलेली लागवड तसेच कमी प्रमाणात खतांचा वापर, कमी मशागत यामुळे बाजरीची उत्पादक क्षमता कमी होते. बाजरीचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय अवलंबले पाहिजेत. मागील काही वर्षापासून ज्वारी व सोयाबीन च्या तुलनेत बाजरी चे क्षेत्र कमी आढळले आहे.
संकरीत वाण -
बाजरीचा श्रद्धा हा वाण ७५ ते ८० दिवसात पक्का होतो जो की उंचीला मध्यम, सर्वसामान्य गच्च कणीस, नारंगी रंग व गडद करड्या रंगाचे दाणे असतात. सबुरी वाण ८५ ते ९० दिवसांमध्ये तयार होतो तसेच प्रतिभा हा वाण ७५ ते ८० दिवसात पूर्णपणे तयार होऊन मध्यम प्रकारात वाढ ही होत.
सुधारीत वाण -
समृद्धी हा बाजरीचा वाण तयार होण्यास ८५-९० दिवस लागतात जे की या वाणाची बाजरी उंच असते तर हिरवट रंगाचे दाणे असतात. परभणी संपदा हा वाण तयार होण्यास ८५ ते ९० दिवस लागतात जे की मध्यम उंचीचा हा वाण असतो.
बिजप्रक्रिया:-
पेरणी करण्याआधी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया पेरणी आधी करावी. मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करण्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळणे व पाण्यावर जे तरंगणारे हलके बुरशी लागलेले बियाणे आहेत ते बाजूला काढावेत व त्याचा नाश करावा आणि जे तळाला राहिलेले बियाणे आहेत ते बाजूला काढून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवा त्यानंतर ते बियाणे सावलीत वाळविणे आणि पेरणीसाठी वापरावे.
ही आहे पेरणीची योग्य वेळ :-
बाजरी ची पेरणी करताना सरी वरंबा पद्धत किंवा सपाट वाफे पद्धत अवलंबीने. २-३ सेमी पेक्षा जास्त खोलवर पेरणी करू नये. पहिला पाऊस होताच पेरणी करावी. हेक्टरी ३-४ किलो बियाणे पेरणीसाठी योग्य आहेत तसेच दोन ओळींमध्ये ४५ सेमी अंतर व दोन रोपांमध्ये १५ सेमी अंतर असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही पेरणीची पद्धत अवलंबली की उत्पादन जास्त प्रमाणात निघेल.
Published on: 18 January 2022, 03:37 IST