News

कधी कधी आपल्याला कुठल्यातरी गोष्टीमुळे खुप उदास/ दुःखी वाटतं, कुणाचा तरी खुप राग येतो किंवा अगदी एखादी व्यक्ती आपल्याशी खुप वाईट वागली असेल तर त्या व्यक्तीचा विचार डोक्यातून जाता जात नाही..

Updated on 08 May, 2022 12:48 PM IST

अशावेळी आपल्या या तीव्र भावनांना वाट मोकळी करून देणं फार महत्त्वाचं असतं.आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अशाप्रकारच्या नकारात्मक भावनांचा निचरा योग्य पद्धतीने करण्यासाठी संगितोपचारात सांगितलेलं एक गंमतीदार technique मला तुमच्याशी आज शेयर करावसं वाटलं.मी स्वतः नकारात्मक भावनांचा निचरा करण्यासाठी हे technique अनेकदा वापरून पाहिले आहे व त्याचे सकारात्मक परिणाम instantly अनुभवले आहेत.आपला मुड ताबडतोब सुधारण्यासाठी हे technique अगदी जादुच्या छडीसारखं काम करते.खरंच. जादूची छडी फिरवल्याप्रमाणे क्षणात आपला मुड बदलतो. व पुन्हा आपल्याला आपल्या मुळ स्वभावानुसार आनंदी वाटायला लागतं.मला खात्री आहे ह्या techniqueची तुम्हालाही मदत होईल.

तुम्हाला माहिती आहे का..आपल्या मेंदूसाठी आपला स्वतःचा आवाज हा इतर कोणाच्याही आवाजापेक्षा जास्त परिणामकारक असतो.हो.. आपला आवाज..आपल्या आतला आवाज.. अगदी मंजुळ,सुमधूर नसला .. अगदी कसाही असला तरीही.. हो..आपला आवाज आपल्या मेंदूला/ आपल्या अंतर्मनाला अधीक प्रभावीपणे भिडतो.तुम्हाला कदाचित वाटेल की गायक मंडळींना या technique चा जास्त फायदा होत असावा.तर ते तस नाही.पेशाने गायक असलेले लोक फार कमी वेळा स्वतःसाठी गातात. पुष्कळदा ते त्यांची कला हि लोकांसाठी सादर करतात. त्यामुळे लोकांना काय आवडेल हा विचार गाणं म्हणताना डोक्यात असतो. त्यामुळे अशा पद्धतीने गाणं म्हणताना त्या गाण्याचा परिणाम मेंदूवर तितकासा प्रभावी नसतो.जेव्हा गाणं हे performance म्हणून सादर न करता फक्त स्वतःसाठी आपण गातो तेव्हाच त्याचा फायदा मेंदूला भावनांचा निचरा करण्यासाठी होतो.आपल्या स्वतःच्या आवाजाने आपण आपल्या भावनांचं नियोजन प्रभावीपणे करू शकतो.

कसं? सोपं आहे. तुम्हाला अशी दहा गाणी निवडायची आहेत, जी तुम्हाला गायला आवडतील. तुम्हाला "आवडतात"अशी नाही तर "गायला आवडतील"अशी.अशा दहा गाण्याची एक लिस्ट तयार करून त्या लिस्टचा मोबाईलमधे फोटोचं काढून ठेवा. कारण साधारणपणे आपला मोबाईल नेहमीच आपल्या बरोबर असतो म्हणजे मग या गाण्यांची यादी नेहमी तुमच्या बरोबरचं असेल.ज्या क्षणी तुमच्या भावना व मनात येणार्या विचारांची दिशा नकारात्मकतेकडे झुकू लागेल तेव्हा लगेच आपल्या गाण्याच्या यादीतील कोणतही गाणं निवडून तुम्हाला स्वतःच्या आवाजात गायचं आहे..जोपर्यंत तुमचे विचार सकारात्मकतेकडे झुकू लागत नाहीत तोपर्यंत गाणं म्हणणं चालूच ठेवायचं आहे.मला खात्री आहे हे तुम्ही करून पाहिलतं तर तुमच्या मुड मधे लगेचच बदल घडवून आणण्यासाठी हे तुमच्याकडे असलेलं हुकमी साधन बनेल.एखादी व्यक्ती वाईट वागली म्हणून आपण आपला मुड बिघडवून घेतो म्हणजेच आपण आपल्या स्वतःच्या विचारांवरचा /भावनांवरचा /स्वतःवरचा ताबा गमवून बसतो.काहींना असही ठामपणे वाटतं की जर त्या व्यक्तीने माफी मागितली तरच आपला मुड चांगला होईल.

याचा अर्थ आपण आपल्या स्वतःच्या मुडला सांभाळण्याची जबाबदारी दुसर्या व्यक्तीवर ढकलत असतो.खरतर लोकं हे त्यांना योग्य वाटत, सोयीचं असतं तसं वागतात. आपल्याला अपेक्षित असल्याप्रमाणे ते वागले नाहीत की आपणचं आपला मुड बिघडवून घेतो. Its not a fair deal.हे वरील technique तुम्हाला नक्की स्वयंपूर्ण बनवू शकेल.मला खात्री आहे तुम्ही प्रयोग करून नक्की बघाल.आपल्या मुडला सांभाळण्याची जबाबदारी घेऊन प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे नाही का?मैथिली सावंत, फिजीओथेरापीस्ट वरिलेशनशीप कोच, सुनील इनामदार.

English Summary: This is a magic wand that improves mood
Published on: 08 May 2022, 12:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)