जगात मोठ्या प्रमाणात पशु पालन केले जाते, पशूचे संगोपन प्रामुख्याने दुधासाठीच केले जाते. जगातील अनेक पशुपालक शेतकरी आपल्या पशुनी जास्तीचे दूध यावे यासाठी विविध उपाययोजना करत असतात. पशूला चांगला आहार देत असतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. मात्र असे असले तरी अनेकदापशु पाहिजे तेवढे दुग्ध उत्पादन देत नाहीत. मात्र तुर्की मधल्या एका अवलियाने आपल्या देशी जुगाड द्वारे गाईची दुध उत्पादन क्षमता वाढवून दाखवली आहे.
भारतात अनेक लोक वेगवेगळ्या कार्यासाठी जुगाड करत असतात. भारतीय हे जुगाड साठी विशेष प्रसिद्ध आहेत, मात्र विदेशी पण काही कमी नाहीत. याचेच हे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. या अवलियाचा गायीचे दूध वाढवण्यासाठी करण्यात आलेला जुगाड सोशल मीडियावर खूपच ट्रेंड करत आहे, सोशल मीडियावर हा जुगाड चांगलाच व्हायरल झाला असून सर्वत्र या जुगाडवर चर्चा रंगली आहे.
नेमका जुगाड आहे तरी कोणता?
तुर्की मधल्या या अवलीयाने आपल्या गाईने अधिकचे दूध द्यावे म्हणून गाईला चक्क वर्च्युअल गॉगल्स घातलेत. वर्चुअल रियालिटी गॉगल्स घालून गाई एक्स्ट्रा दूध देते असं जर आम्ही सांगितलं तर हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. पण खरंच या अवलियाने हा प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील झाल्याचे सांगितले जात आहे. वर्चुअल रियालिटी गॉगल्स गाईला घातले असता गाईने दूध देण्यासाठी सकारात्मकता दाखवली तसेच यामुळे गाइने एक्सट्रा दूध देखील दिले.
जुगाड करणारा अवलिया आहे तरी कोण?
हा प्रयोग तुर्की मधल्या इज्जत कोकाक नामक एका माणसाने आपल्या गाईवर केला असल्याची माहिती समोर येत आहे. इज्जत कोकाक अनुसार, गाईला वर्चुअल रियालिटी गॉगल लावले असता गाईला असा फिल झाला असेल की ती जणू मोकळ्या रानातच चरण्यासाठी उभी आहे, आणि यावरच समाधानी होऊन दूध देण्यासाठी गाईने सकारात्मकता दाखवली शिवाय यामुळे तिच्या दूध उत्पादन क्षमतेत देखील कमालीची वाढ नमूद करण्यात आली. असा दावा या अवलियाने केला आहे.
इज्जत यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, त्यांनी हे वर्चुअल रियालिटी गॉगल विशेष तयार करुन घेतले आहेत. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला देखील घेण्यात आला आहे, गाईला लाल तसेच हिरवा रंग नजरेला पडत नाही त्या अनुषंगाने या गॉगलमध्ये सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक उपाययोजना केले असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. गॉगल तयार केल्यानंतर गाईला बसवला असता गाईने तब्बल 22 लिटर एक्स्ट्रा दूध दिले असल्याची माहिती इज्जत यांनी दिली.
Published on: 13 January 2022, 11:25 IST