News

काळाच्या ओघात शेती क्षेत्रात मोठा आमूलाग्र बदल होत आहे. शेतकरी बांधव आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत पीक पद्धतीमध्ये बदल करीत आहेत. पीक पद्धतीत बदल करणे ही काळाची गरज देखील बनली आहे. पारंपारिक पिकात उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असे होत असताना पीकपद्धतीत बदल शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र पीक पद्धतीत बदल करा परंतु गैरमार्गाचा अवलंब करून शेतीतून उत्पन्न पदरी पाडणे हे चुकीचे आहे. आणि असा चुकीचा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडताना बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वाळकी शिवारामध्ये हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

Updated on 04 March, 2022 6:21 PM IST

काळाच्या ओघात शेती क्षेत्रात मोठा आमूलाग्र बदल होत आहे. शेतकरी बांधव आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत पीक पद्धतीमध्ये बदल करीत आहेत. पीक पद्धतीत बदल करणे ही काळाची गरज देखील बनली आहे. पारंपारिक पिकात उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असे होत असताना पीकपद्धतीत बदल शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र पीक पद्धतीत बदल करा परंतु गैरमार्गाचा अवलंब करून शेतीतून उत्पन्न पदरी पाडणे हे चुकीचे आहे. आणि असा चुकीचा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडताना बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वाळकी शिवारामध्ये हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

या शिवारातील शेतकऱ्याने उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने आणि अल्पकालावधीत श्रीमंत होण्याच्या मानसिकतेने चक्क अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वाळकी शिवारातील प्रकाश पाटील यांनी हा गैरप्रकार केला असल्याचे उघड झाले आहे. प्रकाश यांनी अफू लागवडीची माहिती घेण्यासाठी सोशल मिडीयाचा चांगला प्रभावी वापर केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबचा उपयोग करीत प्रकाश यांनी अफू कसा पिकवायचा याचे व्हिडिओज बघितले आणि अफूची लागवड देखील केली. प्रकाश या नवयुवक शेतकऱ्याने चार बिघे क्षेत्रावर अफूची लागवड केली होती, या नवयुवक शेतकऱ्याने अल्प कालावधीत अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी हा गैरप्रकार केला आणि हा गैरप्रकार या नवयुवक शेतकऱ्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. या नवयुवकाविरुद्ध पोलिसांनी कडक ऍक्शन घेत कारवाई केली आहे. त्यामुळे सोशल मीडिया हे चांगले ज्ञान आत्मसात करण्यासाठी असलेले माध्यम आहे. युट्युब देखील चांगले ज्ञान आत्मसात करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे मात्र, याचा अनेक जण चुकीच्या पद्धतीने वापर करतात आणि यामुळे असे लोक मोठ्या अडचणीत सापडतात. त्यामुळे सोशल मीडियाचा सांभाळून वापर करणे आवश्यक आहे.

पारंपारिक पिकात उत्पादन खर्च अधिक येत असल्याने आणि पदरी कवडीमोल उत्पन्न पडत असल्याने, आणि दिवसेंदिवस डोक्यावर कर्ज वाढत असल्याने प्रकाशने अल्पकालावधीत अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी अफूची लागवड केल्याचे समोर आले आहे. प्रकाशने अफू लागवडविषयी ए टू झेड माहिती अगदी पेरणीपासून ते काढणीपर्यंत युट्युबवरुन आत्मसात केली आणि आपल्या पाच एकर क्षेत्रापैकी चार एकर क्षेत्रावर आंतरपीक म्हणून अफूची लागवड केली. प्रकाशने त्याच्यावर संशय येऊ नये यासाठी आजूबाजू मक्याचे पीक उभे केले. मात्र, असे असले तरी भिंतीला ही कान असतात या उक्तीप्रमाणे पोलिसांना गुप्त सूत्रांनी प्रकाशच्या शेतात अफूची लागवड असल्याचे सांगितले आणि पोलिसांनी देखील यावर ताबडतोब ऍक्शन घेत प्रकाशचा मळा गाठला. शुक्रवारी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुंनगर या दोघी बड्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आपला मोर्चा वळवला. 

प्रकाशला यावेळी पोलिसांनी विचारपूस केली असता प्रकाशने आपण मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याचे आणि डोक्यावर लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगत हा पर्याय निवडला असल्याची कबुली दिली. प्रकाशने लागवड केलेला अफू आगामी काही दिवसात काढणीसाठी तयार होणार होता. मात्र, अफूची काढणी होण्यापूर्वीच पोलिसांनी धडक कारवाई करत अफूची शेतीचे भंडाफोड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित आरोपी शेतकऱ्यावर चोपडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English Summary: this farmer cultivate opium by the guidance of youtube
Published on: 04 March 2022, 06:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)