पारंपारिक पिकांमधून शेतकऱ्यांच्या पदरी जास्त उत्पादन पडत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांनी कडधान्यावर जास्त भर दिलेला आहे. परंतु या निर्णयाला केंद्र सरकार चा अप्रत्यक्षपणे विरोध असल्याचे दिसत आहे. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरू असल्याने उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे किमान दरामधून शेतकरी आधार शोधत आहेत. आता केंद्र सरकारने कडधान्यासाठी मुक्त आयात असे धोरण अवलंबिले आहे त्यामुळे आता तूर आणि हरभरा ची मोठ्या प्रमाणात आयात होऊन दर घटणार असल्याचे अंदाज वर्तविले आहेत. मुक्त आयातीमुळे वेळेचे बंधन राहणार नाही तसेच व्यापारी वर्ग सुद्धा त्यांच्या सोयीनुसार मागणी करू शकतील.
नेमका काय परिणाम होणार?
दरवेळी कडधान्य आयातील वेळ ठरवून दिला जात होता त्यामुळे देशांतर्गत शेतीमालाला किमंत दिली जायची मात्र आता मुक्त आयात धोरणामुळे मार्च महिन्यापर्यंत कडधान्याची आवक सुरू राहणार आहे त्यामुळे स्थानिक बाजरपेठेत सुद्धा त्याच्या दरावर परिणाम होणार आहेत. सध्या कुठेतरी तुरीची आवक सुरू झाली होती तसेच हंगामाच्या सुरुवातीला दर ही चांगला मिळाला होता व भविष्यात सुद्धा दर चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी होती मात्र आता या निर्णयामुळे कडधान्याला मागणी राहील की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गतवर्षीच 5 लाख 80 हजार टन तुरीची आयात :-
मार्च २०२२ पर्यंत तूर, मूग आणि उडीदाची आयात मुक्त करण्यात आली आहे जे की या मुक्त धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कडधान्याची आवक सुरू झाली आहे. २०२१ च्या एप्रिल ते डिसेंम्बर महिन्याच्या दरम्यान ५ लाख ८० हजार टन तुरीची आयात झाली आहे त्यामुळे कमी दर शेतकऱ्यांना भेटला आहे. आयात मुक्त धोरणातून प्रतिबंधित धोरणात टाकणे गरजेचे आहे असा निर्णय अपेक्षित होता. अर्थमंत्र्यानी कडधान्य उत्पादकांना निराश केले आहे.
शेतकऱ्यांकडे पर्याय काय?
सध्या बाजारात केवळ तुरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे त्यामुळे शेतीमालाच्या दरावर सध्या कोणताही परिणाम झालेला नाही. हमीभावाच्या बरोबरीनेच तुरीला सुद्धा दर आहे, परंतु उत्पादन घटले असल्यामुळे भविष्यात दर वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होईलच अशाच दरम्यान केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची झळ अजून स्थानिक बाजार पातळीवर बसलेली नाही.
Published on: 03 February 2022, 02:31 IST