News

कडकनाथ कोंबडी पालन (Kadaknath chicken rearing) हा कमाईचा उत्तम मार्ग ठरू शकतो. या कोंबडीचे वैशिष्ट्य म्हणजे कडकनाथ कोंबडी पूर्णपणे काळी असते तिचे मांस आणि रक्त देखील काळ्या रंगाचे असते. कडकनाथ कोंबडीचे मांस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याची मागणी खूप जास्त असते, त्यामुळे कडकनाथ कोंबडीचे पालन करणाऱ्यांना भरपूर नफा मिळतो.

Updated on 19 April, 2022 10:31 PM IST

कडकनाथ कोंबडी पालन (Kadaknath chicken rearing) हा कमाईचा उत्तम मार्ग ठरू शकतो. या कोंबडीचे वैशिष्ट्य म्हणजे कडकनाथ कोंबडी पूर्णपणे काळी असते तिचे मांस आणि रक्त देखील काळ्या रंगाचे असते. कडकनाथ कोंबडीचे मांस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याची मागणी खूप जास्त असते, त्यामुळे कडकनाथ कोंबडीचे पालन करणाऱ्यांना भरपूर नफा मिळतो.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Former Indian cricket captain Mahendra Singh Dhoni) देखील कडकनाथ कोंबडीचे संगोपन (Ms Dhoni rearing kadaknath) करतो. त्यामुळे हा व्यवसाय करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. ही कोंबडी मोठ्या प्रमाणात खरेदी करून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक कडकनाथ कोंबडी पाळतात. अशा परिस्थितीत तुम्ही येथून कडकनाथची पिल्ले खरेदी करू शकता.

कडकनाथच्या पिल्लांची किंमत 200 ते 300 रुपये यादरम्यान असते. मित्रानो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, पूर्णपणे विकसित झाल्यानंतर, ही कडकनाथ कोंबडी सहजपणे 1500 रुपये किलोपर्यंत विकली जाते. या कोंबडीच्या चिकनमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. याच्या चिकनमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे लोकांना त्याचे मांस खूप आवडते आणि आरोग्यासाठी या कोंबडीचे मांस अतिशय उत्तम असते.

मित्रांनो जर आपण कडकनाथ कोंबडी पालन सुरू केले तर आपणांस मांसासोबतच कडकनाथ कोंबडीच्या अंड्यातूनही भरपूर कमाई होऊ शकते. याच्या अंड्याच्या दराबद्दल बोलायचे झाले तर या कोंबडीचे अंडे 20-30 रुपयांना सहज विकले जाते. म्हणजेच साधारण कोंबडीचे एक अंडे अंडी 5 ते 7 रुपयांना विकली जाते आणि या कोंबडीचे अंडे यापेक्षा तीन पट चढ्या दराने विकले जातात. हिवाळ्यात या कोंबडीच्या मांस आणि अंड्यांचा वापर वाढतो, त्यामुळे नफा वाढण्याची शक्यता अधिक असते.

मित्रांनो या कडकनाथ कोंबडीचे पालन करण्यासाठी तुम्हाला पोल्ट्री फार्म उघडावे लागेल. तुम्ही ते तुमच्या गावात किंवा शहराच्या बाहेर उघडू शकता. पोल्ट्री फार्म नेहमी जमिनीपासून थोड्या उंचीवर बांधावा, जेणेकरून परिसरात पाऊस पडल्यास आत पाणी जाणार नाही. त्याचबरोबर शेतातील तापमान, प्रकाश आणि अन्न व पाण्याची पूर्ण व्यवस्था ठेवावी लागते.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी सेंद्रिय शेती आणि कुक्कुटपालन करत आहेत. धोनीचे मोठे फार्म हाऊस आहे. जिथे ते कडकनाथ कोंबडीचे पालन करतात. धोनीने कडकनाथ कोंबडी पाळण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने दोन हजारांहून अधिक कडकनाथ कोंबडीच्या पिल्लांची ऑर्डर दिली होती. तब्बल महिनाभरानंतर त्यांना या पिलांची डिलिव्हरी मिळाली होती. त्यांनी मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातूनच कडकनाथची पिल्ले मागवली होती.

English Summary: This cricketer doing poultry farming after retirement; You too start and earn
Published on: 19 April 2022, 10:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)