जर महाराष्ट्रातील काही कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा विचार केला तर तिथे गेल्या दोन दिवसापासून कापसाला सलग नऊ हजार पन्नास रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.यामध्ये नंदुरबार आणि परभणीजिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे.
कापसाला मिळत असलेल्या या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील कापूस जास्त प्रमाणात बाजारात न आणता त्याची साठवणूक करण्यावर भर दिला होता. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर तिकडे सुद्धा मागणी वाढल्याने दरात वाढ होत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे दोन दिवसांमध्येच कापूस नऊ हजारावर गेला आहे.
या वर्षी कापूस हंगामाची सुरुवात झाली ती आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने परंतु कालांतराने त्यामध्ये अचानक घट होऊन भावात घसरण झाली.
त्यामुळे नवा जरा वर केलेला कापूस स्टेटस सात हजार रुपयांपर्यंत खाली आणून ठेवला होता. परंतु मंगळवारपासून कापूस दराने पुन्हा घाटात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नऊ हजार रुपये तर मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी नऊहजार पन्नास रुपये दर मिळाला आहे. या भाव वाडी मागे आंतरराष्ट्रीय मागणी तील वाढ कारणीभूत आहेस परंतु स्थानिक बाजारपेठेत देखील कापसाला चांगली मागणी आहे.
कारण देशातील सूतगिरणी आणि कापड उद्योगांमध्ये कापसाचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कापसाची मागणी वाढत आहे परंतु दुसरीकडे शेतकरी वाढीव दराच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक करीत असल्याने आता दिवसागणिक दरात तफावत दिसत आहे. दुसरे एक कारण म्हणजे या वर्षी जास्त पावसामुळे कापसाचे पीक बहुतांशी नष्ट झाली आहे. जे काही पिक शिल्लक होते त्याला बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट झालेली आहे.
Published on: 29 December 2021, 06:18 IST