News

कोरोना महामारी च्या संकटामध्ये बऱ्याच लोकांचा रोजगार गेला. अशातच परत जाणार आर्थिक उत्पन्नासाठी इतर स्त्रोत शोधताहेत. जर तुम्ही पण अशा शोधात असाल तर तुमच्यासाठी फक्त 13 हजार रुपयांमध्ये अगरबत्ती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. या लेखात या व्यवसाय विषयी माहिती करून घेऊ..

Updated on 13 January, 2021 10:38 AM IST

कोरोना महामारी च्या संकटामध्ये बऱ्याच लोकांचा रोजगार गेला. अशातच परत जाणार आर्थिक उत्पन्नासाठी इतर स्त्रोत शोधताहेत. जर तुम्ही पण अशा शोधात असाल तर तुमच्यासाठी फक्त 13 हजार रुपयांमध्ये अगरबत्ती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. या लेखात या व्यवसाय विषयी माहिती करून घेऊ.

जर तुम्ही एखाद्या गावात किंवा छोट्या शहरांमध्ये राहत असाल आणि तुम्ही कोणते काम करू शकता तर तुमच्यासाठी अगरबत्ती व्यवसाय हा फायदेशीर आहे. आपल्याला माहिती आहे की, मोदि  सरकार शहरांमध्ये आणि गावामध्ये राहणार यात तमाम लोकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करीत आहेत. या संधी मध्येच अगरबत्ती उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग द्वारे प्रस्तावित एक रोजगा सुजन कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा :अमूलसोबत व्यवसाय करण्याची संधी; वाढवा आपले उत्पन्न

एका दिवसात 100 किलो तयार होते अगरबत्ती:

भारतामध्ये अगरबत्ती बनवणारे मशीन ची किंमत जवळजवळ 35 हजार रुपये पासून ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत आहे. या मशिनद्वारे आपण एका मिनिटांमध्ये दीडशे ते दोनशे अगरबत्त्या तयार करू शकता. कमी किंमत असणाऱ्या मशीन मध्ये कमी प्रोडक्शन होते म्हणून जास्त नफा मिळत नाही. म्हणून तुम्ही ऑटोमॅटिक अगरबत्ती बनवणाऱ्या मशीन पासून आपला व्यवसाय सुरू केला तर जलद गतीने जास्तीच्या अगरबत्त्या बनवू शकता. एक आटोमॅटिक मशीन एका दिवसात 100 किलो अगरबत्ती बनवते.

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारे मशीन विविध प्रकारचे असतात. यामध्ये मिक्सर मशीन, ड्रायर मशीन आणि मॅन प्रोडक्शन मशीन चा अंतर्भाव होतो. मिक्सर मशीन कच्चा मालाची पेस्ट बनवण्यासाठी कामात येते तर मॅन प्रोडक्शन मशीन तयार पेस्ट ला अगरबत्तीच्या बांबू काडीवर लावण्यासाठी उपयोग येते. अगरबत्ती बनवणारे मशीन हेच सेमी आणि पूर्ण पद्धतीने ऑटोमॅटिक सुद्धा असतात. मशीनची निवड केल्यानंतर इन्स्टॉलेशन च्या हिशोबाने मशीनच्या सप्लायर  सोबत डील  करावी. मशीनवर काम करण्यासाठी ची ट्रेनिंग घेतले तर उत्तम असते. कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी बाजारपेठेतील चांगल्या प्रकारच्या सप्लायर्स सोबत संपर्क ठेवणे महत्वाचे असते. अशा सप्लायरस ची लिस्ट मिळवण्यासाठी अगरबत्ती उद्योगांमध्ये अगोदरपासून व्यवसाय करणाऱ्या लोकांची मदत घ्यावी. कच्चामाल केव्हाही गरजेपेक्षा थोडा जास्त मागवावा कारण या कच्च्या मालाचा काही हिस्सा वेस्टेज होतं.

हेही वाचा :पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन करा टिश्यू पेपरचा व्यवसाय; होईल दमदार कमाई

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे:

गम पावडर, चारकोल पावडर, बास, नर्गिस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सेंट, फुलांच्या पाकळ्या,, चंदनाचे लाकूड, जिलेटीन पेपर, शो डस्ट, पॅकिंग मटेरियल किती लागते.आकर्षक पॅकिंग असते महत्वाचे जर तुम्ही या व्यवसायात काम करू इच्छिता तर तुम्हाला आकर्षक प्रॉडक्ट डिझाईन पॅकिंग वर लक्ष द्यावे लागेल. पॅकिंगसाठी एखाद्या पॅकेजिंग एक्सपर्ट सोबत सल्लामसलत करून आपली पॅकेजिंग आकर्षक बनवावी.

आपल्या पॅकिंग द्वारे लोकांच्या असलेल्या धार्मिक मनस्थिती ला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. अगरबत्तीचे मार्केटिंग करण्यासाठी वर्तमानपत्रे, टीव्ही मध्ये ऍड देऊ शकता केव्हा एखादी ऑनलाईन वेबसाईट सुद्धा बनवू शकता. तेरा हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हा व्यवसाय या व्यवसायाला तुम्ही तेरा हजार रुपयाच्या भांडवलामध्ये घरगुती तसेच हस्त  उद्योगाच्या स्वरूपात  सुरू करू शकता. परंतु तुम्ही मशीन सेटअप करून जरा व्यवसाय सुरू करू इच्छिता तर तुम्हाला जवळ जवळ पाच लाख रुपयांपर्यंत भांडवल लागते.

English Summary: This business can start in 15000
Published on: 13 January 2021, 10:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)