राज्यात तसेच देशात अनेक पशुप्रेमी पशुचे संगोपन करतात, त्यांचे पशुवरचे प्रेमच असते की ते यांच्या संगोपणासाठी हजारोंचा खर्च करतात. काही पशु आपल्या वजनामुळे व किमतीमुळे चर्चेचा विषय ठरतात, अशीच सांगली जिल्ह्यात एक म्हैस आहे जी सध्या लाईट लाईम मध्ये आहे. सध्या सांगली जिल्ह्यातील गजेंद्र नामक म्हशीची संपूर्ण देशभरात चर्चा चालू आहे. जिल्ह्यातील तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना दरवर्षी पशु प्रदर्शनीचे आयोजन करते. या वर्षी देखील हे आयोजन करण्यात आले होते, या पशु प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष होते. यामध्ये गजेंद्र नावाची ही म्हैस आली होती. ज्या देखील पशु प्रेमींनी ही म्हैस बघितली ते तिच्या प्रेमातच पडले. संपूर्ण सांगली जिल्ह्यात नव्हे नव्हे तर संपूर्ण राज्यात या गजेंद्र म्हशीची आता चर्चा सुरू आहे.
अनेक पशुपालक शेतकऱ्यांना या जातीची म्हैस खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांचा असा माणस आहे की या जातीच्या म्हशीचे संगोपन केल्याने त्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल त्यामुळे अनेक पशुपालक शेतकरी या जातीच्या म्हशी कडे विशेष आकर्षित होतात.
80 लाखाची गजेंद्र
गजेंद्र ही तिच्या आकारामुळे पशुप्रेमीना विशेष आकर्षित करते. गजेंद्र कुणी व्हीआयपी पेक्षा कमी नाही हिची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे, हो खरं ऐकलंय तुम्ही तब्बल 80 लाख रुपये. एखाद्या मोठ्या लक्झरी गाडी सारखी या गजेंद्र म्हशीची किंमत आहे. गजेंद्र ही म्हैस महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील एका पशुपालक शेतकऱ्याची आहे, पशुपालक शेतकऱ्याचे नाव विलास नाईक असे आहे. विलास नाईक यांच्या मते या म्हशीचे वजन हे खुप जड आहे तसेच ती अतिशय तंदुरुस्त आहे म्हणून तिचे नाव गजेंद्र असे ठेवण्यात आले.
या गजेंद्र म्हशीला बघण्यासाठी लोक लांबलांबून गजेंद्र यांच्या गावाला भेट देतात, एखाद्या फिल्म ऍक्टर सोबत जसा फोटो काढतात तसा या म्हशीसोबत लोक सेल्फी काढतात, म्हणून ही म्हैस कुण्या व्हीआयपी पेक्षा कमी नाही असे सांगितले जाते आहे. या म्हशीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत आणि ही म्हैस चांगलीच फेमस झाली आहे. गजेंद्र चा आहार देखील विशेष आहे गजेंद्र म्हशीला दिवसाला 15 लिटर दूध प्यायला लागते तसेच चार वेळेस ऊसाची बांडी खायला दिले जाते याशिवाय हिरवा चारा देखील दिला जातो.
Published on: 20 December 2021, 01:25 IST