News

गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. या वर्षीच्या सुरुवातीलाच निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांवर हावी होताना दिसत आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाच्या हजेरीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची कसर काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला होता शेतकऱ्यांना या हंगामातून अधिकच्या उत्पादनाची आशा आहे मात्र शेतकऱ्यांच्या या आशेवर अवकाळी पाणी फेरताना दिसत आहे. सध्या राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा त्राहिमाम् नजरेस पडत आहे. मराठवाड्यात परिस्थिती अजूनच बिकट बनली आहे मराठवाड्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हैदोस घातला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचे संकट अद्यापही टळलेले नाही, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात तसंच राज्यातील इतरही जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे.

Updated on 13 January, 2022 1:50 PM IST

अवकाळी पावसामुळे व त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतात उभ्या असलेल्या अनेक पिकांचे मोठे नुकसान होत आहे, याचा सर्वात जास्त फटका हरभरा पिकाला बसताना दिसत आहे. सध्या राज्यात सर्वत्र तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे आळीचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवत आहे. तसेच नुकत्याच अंकुरण पावलेल्या, रोपावस्थेतल्या हरभरा पिकावर रोप कुरतडणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. म्हणून हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तसेच यामुळे उत्पादनात देखील घट होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणून हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसताच क्षणी विद्यापीठाने सांगितलेल्या सल्ल्याचे पालन करावे जेणेकरून हरभरा पिकाचे नुकसान कमी करता येईल व उत्पादनात घट होणार नाही. 

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाचा सल्ला तरी काय

  • घाटे अळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकावर कमी प्रमाणात असल्यास प्रति एकरी वीस पक्षी थांबे लावण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे. हे पक्षी थांबे T आकाराचे असले पाहिजे, असे देखील विद्यापीठाने यावेळी नमूद केले आहे.
  • घाटे आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावण्याची देखील विद्यापीठाने शिफारस केली आहे.
  • घाटे अळीचा प्रादुर्भाव हा जास्त असल्यास आणि यामुळे आर्थिक नुकसान जास्त होणारे असल्यास, इमामेक्टिन बेंझोएट 5% हे कीटकनाशक 40.5 ग्रॅम प्रती 100 लिटर पाणी या प्रमानात घेऊन फवारणी करावी शेतकरी मित्रांनो प्रती दोन एकर क्षेत्रासाठी 176 ग्रॅम इमामेक्टिन बेंझोएट 5% वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो आपण या ऐवजी क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5% हे कीटकनाशक - 30 मिली प्रती 100 लिटर पाणी या प्रमानात घेऊन फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो प्रती दोन एकरसाठी 120 मिली क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5% हे कीटकनाशक फवारण्याची शिफारस केली गेली आहे.
English Summary: this agricultural university gave advice to farmers
Published on: 13 January 2022, 01:50 IST