राज्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले. उत्तर महाराष्ट्र, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसानंतर आता मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे उन्हाळी कांदा यांसह इतर हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी वाशी आणि भूम या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ऐन हंगामातील पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय पशुहानी देखील झाली आहे.
मराठवाड्यात उन्हाळी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र या आपत्कालीन परिस्थितीमुळे हाती आलेल्या कांद्याचे बरेच नुकसान झाले आहे. शिवाय उभ्या पिकालाही फटका बसला आहे. ऐन हंगामी फळबागांवर देखील याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. कलिंगडाला सध्या बाजारात बरीच मागणी असताना अवकाळी पावसामुळे त्याचा दर्जा कमी झाला आहे.
वादळी वाऱ्यासह बरसणारा पाऊस आणि त्यात विजेचा कडकडाट या दुहेरी संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतमालाबरोबर पशूंच्या हाणीलाही सामोरे जावे लागत आहे. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे आनंदराव भराटे यांच्या गायीच्या अंगावर वीज कोसळली तर दुसरीकडे भूम तालुक्यातील रामकुंड येथे हनुमंत बोराडे यांच्या दोन गायींच्या अंगावर वीज कोसळून त्याही दगावल्या आहेत.
फळबागांवर वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. आंबा या फळाला सध्या बाजारात बरीच मागणी असताना अवकाळी पावसाने त्याचा दर्जा कमी केला. आंबे गळ झाल्यामुळे आंबे डागाळले आहेत. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी नेहमीच प्रयत्नशील असतो, मात्र आपत्कालीन स्थिती अडथळा ठरत आहे.
अवकाळी पावसामुळे हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांत हळद आणि कांदा बीज यांसह अनेक हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात सध्या हळद शिजवण्याचे काम सुरु असते. मात्र या परिस्थीतीत ही कामे खोळंबली आहेत. यामुळे शेतकऱ्यांपुढे जगावे की मारावे असा प्रश्न पडला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आपत्कालीन पीक नियोजन ठरतय फायदेशीर, वाचा संपूर्ण माहिती..
सनीच्या वाढदिवसाची राज्यात चर्चा!! चांदीची गदा देऊन केला वाढदिवस केला साजरा..
बेरोजगारांसाठी आशेचा किरण घेऊन येत आहे सरकारचा हा उपक्रम, ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात
Published on: 24 April 2022, 12:34 IST