News

बॉलीवूड मधील सिनेस्टार असो किंवा मराठी चित्रपट सृष्टीतील मराठमोळे कलाकार; कला सृष्टीतील हेकलावंत चमचमणाऱ्या विश्वातील तारे म्हणून ओळखले जातात. आपण त्यांना हिरो अथवा हिरोईन म्हणून संबोधत असतो, मात्र ते हिरो अथवा हिरोईन आपल्या चित्रपटातील भूमिकेमुळे ठरत नसून आपल्या कर्तृत्वामुळे ठरतात. चित्रपट सृष्टीत केवळ ते अभिनयात नायक अथवा नायिका असतात मात्र खऱ्या-खुऱ्या आयुष्यात काही बोटावर मोजण्याइतकेच सिनेसृष्टीतील कलाकार हिरो अथवा हिरोईन म्हणून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असतात. अशाच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारांच्या यादीत मुळशी पॅटर्न फेम एका मराठमोळी अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे.

Updated on 07 March, 2022 12:03 PM IST

बॉलीवूड मधील सिनेस्टार असो किंवा मराठी चित्रपट सृष्टीतील मराठमोळे कलाकार; कला सृष्टीतील हेकलावंत चमचमणाऱ्या विश्वातील तारे म्हणून ओळखले जातात. आपण त्यांना हिरो अथवा हिरोईन म्हणून संबोधत असतो, मात्र ते हिरो अथवा हिरोईन आपल्या चित्रपटातील भूमिकेमुळे ठरत नसून आपल्या कर्तृत्वामुळे ठरतात. चित्रपट सृष्टीत केवळ ते अभिनयात नायक अथवा नायिका असतात मात्र खऱ्या-खुऱ्या आयुष्यात काही बोटावर मोजण्याइतकेच सिनेसृष्टीतील कलाकार हिरो अथवा हिरोईन म्हणून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असतात. अशाच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारांच्या यादीत मुळशी पॅटर्न फेम एका मराठमोळी अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे.

मित्रांनो आपण मुळशी पॅटर्न हा चित्रपट बघितलाचं असेल या चित्रपटात चहाची टपरी चालविणाऱ्याचा रोल मालविका गायकवाड या अभिनेत्रीने केला होता. हीच अभिनेत्री सध्या सोशल मीडियात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे तुम्ही म्हणणार अभिनेत्री मग चर्चा तर होणारच मात्र ही चर्चा तिच्या अभिनयाची किंवा चित्रपटसृष्टीतील एखाद्या मुद्द्यावरील नसून तिच्या शेतीवरील अफाट प्रेमाची आहे. मराठमोळी मालविका गायकवाड शेती करते आणि फक्त शेतीच करते असं नाही तर शेतकऱ्यांना मदत करीत अठरा कोटींची कंपनी देखील यशस्वीपणे चालवित आहे. मित्रांनो मालविका ही मुळात आयटी इंजिनीअर म्हणून काम करत होती. आपले इंजिनियरिंगचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ती पुण्यातील मल्टिनॅशनल आयटी कंपनी मध्ये कामास रुजू झाली होती, नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात तिला आयटी क्षेत्र मोठे आवडत होते मात्र हळूहळू मालविका आयटी क्षेत्रातील ग्लॅमरस, पैसा, रंगीत जग याला कंटाळली आणि मग तिने शेती क्षेत्राकडे जाण्याचे ठरवले. तिने तिच्या पगाराच्या पैशातून पुण्याच्या शिरूर येथे दीड एकर शेती खरेदी केली. या शेतीत सेंद्रिय पद्धतीने पिकांची जोपासना करायची असा तिने निर्धार केला होता. पण तिच्या या निर्णयाचे तिच्या आप्तेष्टांनीच खंडन केले नव्हे नव्हे तर तिला वेडे म्हणूनच संबोधले. पण जिद्दी स्वभावाची मालविका आपल्या निर्णयावर ठाम राहिली, कालांतराने तिच्यासारखेच विचार ठेवणारे दोन मित्र तिला येऊन भेटले आणि मालविका आपल्या मित्रांसमवेत सेंद्रीय शेती करण्यात गुंग झाली.

मालविकाला शेती एवढी आवडली कि, तीने शेतीसाठी जंगी पगाराची नोकरी देखील कुर्बान केली. मालविका ने पुढे चालून स्वतःचीच एक कंपनी उभारली, तिने कंपनीला ऑरगॅनिक कार्बन असे नाव दिले. त्या कंपनीचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. एवढेच नाही मालविका शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय देखील उतरली तिने आपल्या दोन मित्रांसह अर्थातच विषाल चौधरी आणि जयंत पाटील यांच्याबरोबर दुग्ध व्यवसायात एंट्री घेतली. यासाठी हम्पी 2 नावाची या तिघांनी एक कंपनी सुरू केली. या कंपनीत अनेक दुग्धजन्य पदार्थ व्यतिरिक्त कोकोनट ऑइल मिल्क ऑइल यांसारखे पदार्थ देखिल बनू लागले. ही कंपनी वर्षाकाठी 18 कोटींची उलाढाल करते आणि चार कोटींचा निव्वळ नफा कमविते.

मालविका एकदा जिम मध्ये असताना, मुळशी पॅटर्न मधील प्रवीण तरडे यांच्या मित्राने तिला बघितले आणि चित्रपटात काम करणार का? अशी विचारणा केली. मालविका ने मला आवडेल पण मला चित्रपटातलं काहीच ज्ञान अवगत नाही असे सांगितले. प्रवीण तरडे च्या त्या मित्राने तिची भेट प्रवीण तरडे सोबत खालून दिली आणि मालविका चित्रपटात झळकली. पण तीच एक खरं प्रेम मातीची जुळलेलं होतं अर्थात तिथे खरं प्रेम शेतीशीचं होतं. चित्रपटात काम केल्यानंतर देखील आपल्याला शेती करणेच अधिक पसंत आहे अशी म्हणणारी मालविका आज शेती क्षेत्रात खरंच सक्सेसफुल ठरली. मालविका केवळ एक अभिनेत्री नसून बडोद्या घराण्याची राजकुमारी देखील आहे. मित्रांनो मालविका बडोद्याच्या गायकवाड या राजघराण्यातील राजकुमारी आहे. 2020 मध्ये गायकवाड घराण्याची राजकन्या, मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि अर्थातच मातीशी नातं असलेली एक शेतकरी बाई सिद्धार्थ सिंगवी सोबत लग्नाच्या बंधनात साता जन्मासाठी अडकली.

English Summary: these heroin eran 18 crore from farming learn more about this story
Published on: 07 March 2022, 12:03 IST