News

झारखंड राज्य हे मत्स्यव्यवसायात नेहमी अग्रेसर असते. झारखंड मधील शेतकरी खूप मेहनत करून प्रति वर्ष जास्तीत जास्त माशांचे उत्पादन काढतात. मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना या पोषक वातावरणात प्रोत्साहित करण्यासाठी तेथील राज्य सरकार वेगवेगळ्या योजना सुद्धा आखत आहेत त्यामुळे माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Updated on 17 September, 2021 6:59 PM IST

झारखंड राज्य हे मत्स्यव्यवसायात नेहमी अग्रेसर असते. झारखंड मधील शेतकरी खूप मेहनत करून प्रति वर्ष जास्तीत जास्त माशांचे  उत्पादन  काढतात. मत्स्य  उत्पादक  शेतकऱ्यांना  या पोषक वातावरणात प्रोत्साहित करण्यासाठी तेथील राज्य सरकार वेगवेगळ्या योजना सुद्धा आखत आहेत त्यामुळे माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे.

सध्या पाहायला गेले तर तेथील मत्स्य उत्पादक शेतकरी चार योजनांचा लाभ घेऊ शकतात. ज्यामध्ये मासे-कम-बदक शेती, कोळंबी मासे पालन, जेलनेट  पुरवण्याची  योजना  आणि लाईफ जॅकेट्स देण्याची योजना अशा या चार योजना. किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून तेथील शेतकरी मत्स्यपालनासाठी कर्ज सुद्धा घेऊ शकतात.

मासे कम बदक शेती योजना -

मासे कम बदक शेती या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या व्यक्तीकडे किमान दोन एकर जमीन पाहिजे. जिल्ह्यातील दोन लाभार्थ्यांकडून दोन एकर मध्ये ही योजना आखायची आहे जे की यासाठी तुम्हाला २ लाख ७९ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या योजनेत सरकार कडून १ लाख २२ हजार तर तुम्हाला १ लाख ५७ हजार भरायचे आहेत.

लॉबस्टर फिश फार्मिंग योजना -

लॉबस्टर फिश फार्मिंग या योजनेसाठी सरकारकडून तुम्हाला १ लाख २० हजार रुपये दिले जाणार आहेत तर तुम्हाला ३० ते ३५ हजार रुपये भरावे लागणार आहेत. लॉबस्टर फिश फार्मिंग या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्त्याकडे किमान १ एकर जमीन असणे आवश्यक आहे.

मासे जीवन सहकार्य समिती -

मासे जीवन सहकार्य समिती ही तिसरी योजना मत्स्य जीव सहयोग समितीच्या सदस्य लोकांसाठी च आहे. या योजनेमध्ये समतीमधील १५ सदस्यांना जेलनेट देण्याची योजना आहे. अडीच हजार ते तीन हजार जेलनेट ची किमंत आहे जे की या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पाचशे ते एक हजार गुंतवावे लागणार आहेत.

लाईफ जॅकेट योजना -

लाईफ जॅकेट या योजनेचा लाभ त्याच व्यक्तींना घेता येणार आहे जे व्यक्ती मत्स्यपालक पिंजरा संस्कृतीद्वारे मत्स्यपालन करतात. फक्त २० मच्छिमारांना लाईफ जॅकेट देण्याची योजना आहे जे की या जॅकेट ची किमंत एक हजार सहाशे रुपये आहे. लाभार्थ्यांना फक्त २०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सध्या या चार योजना सरकारने आखलेल्या आहेत.

हेही वाचा:क्विनोआ हे जगातील सर्वात पौष्टिक धान्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा

हा विभाग या योजनांवर काम करतो -

प्रत्येक वर्षी विभागाकडून मत्स्य उत्पादकांसाठी अनेक योजना आखलेल्या असतात मात्र कोरोनामुळे हा योजनांना ब्रेक लागलेला होता. सुमारे ४२ योजना विभागाकडून चालवल्या जात आहेत.

मच्छीमारांसाठीही किसान क्रेडिट कार्ड -

किसान क्रेडिट कार्ड चा लाभ आता मत्स्य उत्पादकांना सुद्धा घेता येणार आहे जे की यापूर्वी ही सुविधा मत्स्य उत्पादकांना न्हवती. मत्स्य उत्पादकांना किसान क्रेडिट कार्ड ची सुविधा कर्ज उपलब्ध करण्यासाठी दिली आहे. मिश्र मत्स्यपालनासाठी 60 हजार, मत्स्यबीज उत्पादनासाठी 39 हजार, बदक-कम-मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना 91 हजार 200 रुपये आणि पिंजरा मत्स्यपालनासाठी 1 लाख 80 हजार रुपये एवढे कर्ज देण्यात येणार आहे.

English Summary: These four schemes will be of great benefit to the fishermen, earning millions
Published on: 17 September 2021, 06:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)