Kanda Anudan :- कांद्याच्या घसरलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता कांदा अनुदान वितरणाचे नियोजन करण्यात आले असून जिल्हानिहाय अनुदान देखील मंजूर करण्यात आलेले आहे. परंतु आता कांदा अनुदानाची जी काही मागणी आहे त्या मागणीच्या 53% अनुदान रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे अजून संपूर्णपणे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. जर आपण कांदा अनुदानासाठी दाखल झालेल्या अर्जांची स्थिती पाहिली तर 30 एप्रिल पर्यंत राज्यांमधून चार लाख 13 हजार 83 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते व यामधून तीन लाख 36 हजार 476 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले.
परंतु त्यानंतर सरकारने या अनुदानासाठी लावलेल्या अटी व शर्ती काढून टाकल्या व त्यामुळे अजून देखील अर्ज दाखल होत आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 19 ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्यात आलेले अनुदानाची रक्कम पाहिली तर ती 844 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
वाचा कोणत्या जिल्ह्याला किती झाले अनुदान मंजूर?
1- नासिक- सर्वात जास्त अनुदान मंजूर झाले असून ते एकूण 436 कोटी 61 लाख 23 हजार 578
2- धाराशिव- 22 कोटी 88 लाख 64 हजार 796
3- अहमदनगर- 102 कोटी 79 लाख 36 हजार 917
4- सोलापूर- 101 कोटी 16 लाख 71 हजार 448
5- रायगड- 68 लाख 16 हजार 631
6- सातारा- तीन कोटी 38 लाख सहा हजार तीनशे आठ
7- सांगली- सात कोटी 99 लाख 12 हजार 868
8- पुणे- 66 कोटी 89 लाख सहा हजार 698
9- छत्रपती संभाजीनगर- 20 कोटी 25 लाख 9917
10- यवतमाळ- पाच लाख 63 हजार 707
11- लातूर- एक कोटी तेरा लाख 81 हजार तेरा
12- वर्धा- पाच लाख 84 हजार 692
13- नांदेड- एक कोटी तेरा लाख 81 हजार तेरा
14- बीड- 22 कोटी 53 लाख 62 हजार 945
15- कोल्हापूर- 13 कोटी 43 लाख 67 हजार 450
16- जळगाव- 23 कोटी 16 लाख 17 हजार 753
17- धुळे- बारा कोटी 62 लाख 68 हजार 296
18- चंद्रपूर- दहा कोटी 24 लाख 21 हजार 676
19- अमरावती- 33 लाख 92 हजार 608
20- बुलढाणा- 33 लाख 92 हजार 608
Published on: 20 August 2023, 10:13 IST