News

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून आता सर्व प्रकारच्या फाटलेल्या आणि जुन्या नोटांसाठी गाईड लाईन जारी करण्यात आली आहे. ज्यानुसार, ग्राहक बँकेत जाऊन अशा पद्धतीच्या नोटा बदलू शकतात. तर चला पाहू त्याबद्दलची माहिती. जर तुमच्याकडे जुने किंवा फाटलेल्या नोटा असतील तर अशा नोटांना कोणत्याही दुकानदार घेत नाही किंवा असा कुठलाही समस्या आहे.

Updated on 28 October, 2020 4:26 PM IST


रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून आता सर्व प्रकारच्या फाटलेल्या आणि जुन्या नोटांसाठी गाईड लाईन जारी करण्यात आली आहे. ज्यानुसार, ग्राहक बँकेत जाऊन अशा पद्धतीच्या नोटा बदलू शकतात. तर चला पाहू त्याबद्दलची माहिती. जर तुमच्याकडे जुने किंवा फाटलेल्या नोटा असतील तर अशा नोटांना कोणत्याही दुकानदार घेत नाही किंवा असा कुठलाही समस्या आहे. तर काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण तुम्ही आता या नोटा तर सोप्या पद्धतीने बदलू शकतात. रिझर्व बँक इंडियाकडून या नोटांसाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. या गाईड लाईननुसार ग्राहक बँकेत जाऊन अशा नोटा सहज बदलू शकतात.

भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला जुन्या फाटलेल्या नोटा स्वीकार करावे लागतात. त्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या बँक ब्रांचमध्ये जाऊ नोटा बदलू शकतात. यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही तसेच यासाठी तुम्ही संबंधित बँकेच्या ग्राहक असणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या नोटा बदलणे हे सर्वस्वी बँकेवर अवलंबून असते. यासाठी कुठलाही ग्राहक बँकेला जबरदस्ती करू शकत नाही. बँक नोट घ्यायच्या वेळेस बँक चेक करते की, नोट जाणून बुजून तर फाडली नाही ना. त्याशिवाय त्या नोटीची कंडिशन कशी आहे, हे सगळं पाहूनच बँक सुलभ कॅनॉट बदलून घेऊ शकतात.

कोणत्या नोटांना बदलले जाऊ शकत नाही?

 काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नोटांना बदलू जाऊ शकत नाही. भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार, जळालेल्या अवस्थेत असलेली नोट, तुकडे तुकडे व्हायच्या स्थितीत असणारे नोट बदलून देऊ शकत नाही. अशा पद्धतीच्या नोटांना रिझर्व बँकेच्या इशू ऑफिसमध्ये जमा करावे लागतात.

 बिल किंवा टॅक्स भरू शकता

 या नोटाद्वारे तुम्ही तुमचे एखादी बिल किंवा टॅक्स रिटर्न बँकेत भरू शकता. त्यानंतर अशा प्रकारच्या नोटा बँकेमध्ये जमा करून तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम वाढवू शकता.

 या नोटांचा वापर नका करू

एखादा राजनैतिक संदेश लिहिलेला असतो अशा नोटांचा वापर केला जाऊ शकत नाही.

English Summary: There will be no charge for replacing torn notes, but ...
Published on: 28 October 2020, 04:25 IST