लॉकडाऊनच्या आधी दुधाला 35 त ते 35 रुपये प्रति लिटर दर मिळत होता. मात्र लॉकडाऊन नंतर दर थेट 22 रुपयांवर आला. दीड महिन्यांपूर्वी दूध विकास मंत्र्यांसोबत होऊनही दरवाढ केली नसल्याने राज्यात पुन्हा एकदा किसान सभा, राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीने दूध दरासाठी सोमवारी 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळीही दूध संकलन केंद्र हेच आंदोलनाचे केंद्र असेल. मागम्याची तीव्रता सरकारला गांबीर्य़ाने कळावी, यासाठी सोशल मीडिया प्रसार माध्यमाची मदत घेतली जाणार आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची बुधवारी ऑनलाईन बैठक झाली. किसान सभेते नेते डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, ज्योतिराम जाधव, यांच्यासह कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते.
16 जिल्ह्यात होणार तीव्र आंदोलन
दूध दराच्या आंदोलनात नगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे, जळगावसह 16 जिल्ह्यात प्रामुख्याने दूध आंदोलन होणार आहे. 9 ऑगस्टला सकाळी आंदोलक दूध केंद्रावर येऊन निर्दर्शने करतील. सरकाररुपी दगडाला अभिषेक घालून निषेध करतील. दुपारी तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. आंदोलनाचे जातीत फोटो, व्हिडिओ, मेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांना पाठवून दूधदराची तीव्रता कळवली जाणार आहे.
दुधविकास मंत्री व खासगी संघाचे प्रतिनिधी यांची मंत्रालयात बैठक होऊन दीड महिना झाला तरी दराबाबत निर्णय होत नस्लयाने शेतकरी संतप्त आहेत. दरम्यान राज्यातील आंदोलनाला देशभर करण्यात येणार आहे. त्यामुळे अखिल किसान सभेच्या माध्यमातून देशव्यापी संघटन करण्याचे नियोजन केले आहे.
काय आहेत मागण्या
दुधाला लॉकडाऊन पूर्वी प्रति लिटर 35 रुपये दर मिळत होता. तो दर परत लागू करावा. दुधाला एफआरपी कायदा लागू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने नोट तयार केली असून त्याला तातडीन मंजुरी देऊन कायदा करावा. दूध व्यवसायात उसाप्रमाणे 80-20 फॉर्म्युला करावा. खासगी आणि सरकारी लुटमार विरोधी कायदा करावा. महाराष्ट्रात एक राज्य एक ब्रँण्ड संकल्पना तातडीने अंमलात आणावी. सदोष मिल्कोमीटर मधून होणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबवा.
Published on: 07 August 2021, 11:11 IST