दिवसेंदिवस कापसाचे क्षेत्र घटत चालले आहे जे की यास कारणीभूत म्हणजे कापसाचे घटलेले दर आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावमुळे नापीक शेतजमीन. मराठवाडा तसेच विदर्भात खरीप हंगामात मुख्य कापसाचे पिक घेतले जाते जे की मागील ५ वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली होती. मागील ५० वर्षाच्या कालावधीत जे कधी घडले नाही ते यंदा कापसाच्या दराबाबत घडले आहे. यंदा कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये असा दर मिळाला आहे. येणाऱ्या खरीप हंगामात देशात तब्बल १० लाख हेक्टरवर क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. जे कापसाचे घटलेले क्षेत्र आहे ते पुन्हा वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
11 राज्यांमध्ये कापसाची लागवड :-
देशात ११ राज्यात कापसाचे तब्बल १३० लाख हेक्टरवर क्षेत्र आहे मात्र मागील ५ वर्षामध्ये १० लाख हेक्टर क्षेत्राची घट झाली होती. कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाना, राजस्थान, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा अशा 11 राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ४० लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र असते मात्र मागील वर्षी ३५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. तर दुसऱ्या बाजूला कापसाची जागा सोयाबीन ने घेतली आहे. दिवसेंदिवस सोयाबीन चे क्षेत्र वाढत असल्यामुळे कापूस पिकाला फटका बसत आहे. कापसाचे उत्पादन घटले असल्यामुळे यंदा कापसाचे दर तर वाढले मात्र याचा परिणाम येणाऱ्या हंगामावर होईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
यापूर्वी सोयाबीनमुळेच घटले होते क्षेत्र :-
शेतकरी उत्पादनाच्या दृष्टीने पिकपद्धतीत बदल करत असतात जे की बाजारात ज्या गोष्टीला जास्त दर त्यावर शेतकरी भर देत असतो. याआधी सोयाबीन चे दर वाढले होते तर कापूस पिकामुळे शेतजमिनीचा खराबा आणि दिवसेंदिवस उत्पादनात घट होत निघाली आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कापसाची जागा ही सोयाबीन पिकाने भरून काढलेली आहे. म्हणून खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन ला ओळखले जाते. आता दरात बदल झाले असल्याने शेतकरी पुन्हा पिकाबाबत विचार बदलतोय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
अकोट बाजार समितीमध्ये 12 हजाराचा दर :-
अकोला जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक राहिले आहे. काळाच्या ओघात अकोला मधील शेतकऱ्यांनी सुद्धा पीक पद्धतीत बदल केले आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट ही कापसाची मुख्य बाजारपेठ आहे. यंदा कापसाला बाजार समितीत १२ हजार क्विंटल चा दर मिळाला आहे. जे की विक्रमी दरामुळे अकोला जिल्ह्यात कापसाचे पुन्हा क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा आला की कापसाची लागवड केली जाते, जे बाजारात बियाणे उपलब्ध राहतात.
Published on: 26 March 2022, 04:03 IST