News

मुंबई: एप्रिल 2020 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासंदर्भात सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांना मंत्रालयातून निर्गमित करण्यात आले.

Updated on 23 April, 2020 10:11 AM IST


मुंबई:
एप्रिल 2020 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासंदर्भात सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांना मंत्रालयातून निर्गमित करण्यात आले.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आपत्ती काळात मदत व्हावी, याकरिता राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी हे आदेश निर्गमित व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले. या आपत्तीत शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करावेत. 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य ती मदत मिळावी, यासाठी सविस्तर अहवाल अ ब क ड नमुन्यामध्ये कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनास पाठवावा.

फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये अशाच प्रकारच्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेत पिकाचे नुकसान झाले होते. त्याबाबत ज्या पिकांची मदतीची मागणी केली आहे अथवा केली जाणार आहे त्या पिकांचा समावेश अथवा मदतीची द्विरूक्ती यात होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत.

English Summary: There will be a panchnama on the damage caused by hailstorm and unseasonal rains
Published on: 23 April 2020, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)