कांदा हे एक एक नगदी पीक आहे. नगदी पीक म्हणजे जे पीक आपल्याला बक्कळ नफा मिळवून देईल. नगदी पिकांमध्ये अनेक पिके येतात त्यामध्ये ऊस, कापूस, नीळ, तंबाखू, कांदा इत्यादी. आपल्याकडे उसानंतर सर्वात जास्त कांदा हे पीक घेतले जाते. कारण कमी कालावधीत कांदा बक्कळ पैसे मिळवून देऊ शकतो. कांद्याचा काळ हा 3 महिने ते 5 महिने एवढाच असतो. त्यामुळे कांद्यापासून कमी वेळात जास्त उत्पन्न आणि बक्कळ फायदा मिळत असतो त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. सध्या बाजारात कांद्याला मोठी मागणी आहे शिवाय सध्या बाजारात कांद्याच्या भावात मोठी वाढ सुद्धा होताना दिसत आहे.
4 हजार क्विंटल कांद्याची आवक:-
यंदा च्या वर्षी गावरान म्हणजेच देशी कांद्याच्या लागवडी खालील क्षेत्र खूप कमी आहे. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली त्यामुळे यंदा च्या वर्षी कांद्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. पुणे जिल्ह्यातील खेड बाजार समिती मध्ये 8 हजार पिशव्यांची आवक होती. तरी सुद्धा आवक वाढून पण कांद्याच्या भावात अजिबात बदल झालेला नाही. येणाऱ्या काही दिवसांपर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे.यंदा च्या वर्षी कांद्याची आवक वाढली असून पण यंदा च्या वर्षी कांद्याच्या भावात स्थिरता आढळून आलेली आहे. सध्या बाजारात देशी कांद्याला म्हणजेच पंचगंगा कांद्याला मोठी मागणी आहे. कारण हा कांदा जास्त दिवस टिकवता येतो त्यामुळे या कांद्याला हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणि कांद्याची आवक वाढून सुद्धा कांद्याच्या भावात स्थिरता असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.
निर्यातीमुळे बळीराजाला अधिकचा फायदा:-
सध्या पुणे खेड आणि चाकण बाजार समिती मध्ये कांद्याची आवक वाढत आहे परंतु आवक वाढून पण दरामध्ये अजिबात सुद्धा बदल न झाल्यामुळे बळीराजा समाधानी आहे. शिवाय आतापर्यंत कांद्याची निर्यात ही फक्त लोकल साठी होत होती. मात्र जेव्हा कांद्याची निर्यात बाहेरच्या ठिकाणी होण्यास सुरुवात होईल तेव्हा कांद्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने बळीराजा कांद्याच्या उच्च भावाची आस लावून बसला आहे. निर्यातीमुळे शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार हे निश्चित आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सुरूच:-
या वर्षी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे. परंतु आवक जास्त होऊन सुद्धा कांद्याचे भाव स्थिर राहिलेले आहेत. सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये कांद्याची विक्रमी आवक झाल्यामुळे 2 दिवस सोलापूर बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. चालू मध्ये सध्या सोलापूर बाजार समिती मध्ये 35 ते 40 हजार क्विंटल कांद्याची आवक होत असली तरी कांद्याच्या भावाला स्थिरता मिळाली आहे. सध्या कांद्याला क्विंटल मागे सरासरी भाव हा 2 हजार रुपये मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा समाधानी आहेत. सध्या आपल्या राज्यात बाहेरील राज्यांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा येत असल्याने महाराष्ट्र राज्यात कांद्याची आवक वाढत आहे.
कांद्याचा हमीभाव:-
सध्या कांद्याला 1700 रुपये ते 3200 रुपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे शिवाय कांद्याला सरासरी भाव हा 2000 रुपये एवढा मिळत आहे. परंतु राज्यातून कांद्याची निर्यात अजून सुरू झाली नाही. एकदा राज्यातील कांद्याच्या निर्यातीला सुरुवात झाली तर कांद्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने दर्शवली आहे.
Published on: 10 February 2022, 05:57 IST