News

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 300 इथेनॉल इंधन पंप उभारण्याची योजना आखली आहे.त्याला पेट्रोलियम मंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे आता देशभरातील साखर कारखान्यांनी पेट्रोल-डिझेल पंपाच्या बरोबरीने इथेनॉल पंप सुरू करता येतील.नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय)तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत बोलताना ही माहिती दिली.

Updated on 15 January, 2024 10:26 AM IST

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 300 इथेनॉल इंधन पंप उभारण्याची योजना आखली आहे.त्याला पेट्रोलियम मंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे.नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत बोलताना ही माहिती दिली.त्यांनी साखर कारखानदारांना कारखान्यात इथेनॉल पंप सुरू करण्यास सांगितले आणि सर्व मोटारसायकल, स्कूटर, कार इत्यादींना 100 टक्के बायोइथेनॉलचे सेवन आणि पुरवठा करण्याची सूचना संबंधितांना केली.

देशात इथेनॉलचे ३०० पंप होणार
वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी, या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते गडकरी यांच्या हस्ते या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.त्यावेळी बोलतांना ते म्हणैलेत.केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन धोरणानुसार देशात फक्त इथेनॉलचे ३०० पंप सुरू करण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे आता देशभरातील साखर कारखान्यांनी पेट्रोल-डिझेल पंपाच्या बरोबरीने इथेनॉल पंप सुरू करता येतील.त्यामुळे देशातील रस्त्यांवरून पूर्णपणे इथेनॉल आणि हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या धावतील,असेही ते गडकरी म्हणाले.सरकारच्या इथेनॉल योजने संदर्भात गडकरी म्हणाले की २०२४-२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल आणि २०२९ पर्यंत ३०टक्के साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

काय आहेत या मागची उद्दीष्टे
सरकारच्या इथेनॉल योजने संदर्भात गडकरी म्हणाले की २०२४-२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल आणि २०२९ पर्यंत ३०टक्के साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
देशातील तेल आयात कमी करणे
ऊर्जा सुरक्षा सुधारणे
कार्बन प्रदूषण कमी करणे
हवेची गुणवत्ता सुधारणे


भारत एक दिवस ऊर्जेचा निर्यातदार देश बनेल,देश आणि शेतकरी दोघांनाही फायदा
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, सरकारने २०२५ पर्यंत इथेनॉल पंपांची संख्या ९३०० पेक्षा जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांची बचत होत असून शेतकऱ्यांनाही फायदा होत असल्याचे गडकरी म्हणाले. साखर कारखानदारांना इथेनॉल उत्पादनासाठी साखर वापरण्याच्या सरकारच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या अडचणी एप्रिलनंतर सोडवण्यात येतील आणि त्यांनी काळजी करण्याची गरज नाही,अशी ग्वाही त्यांनी दिली.
गडकरी म्हणाले की,भारत एक दिवस ऊर्जेचा निर्यातदार देश बनेल आणि त्यासाठी शेतीचा विकास करणे आवश्यक आहे.

English Summary: There will be 300 ethanol pumps in the country Ethanol Production ethanol ethanol news
Published on: 14 January 2024, 03:14 IST