News

सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले

Updated on 29 August, 2022 2:01 PM IST

सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले या गावांमध्ये २९ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. परंतु सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांचे कोणतेही नियोजन दिसुन आले नाही. ग्रामपंचायतीची ग्रामसभा पुरेशी गणसंख्या नसल्याने तहकुब करावी लागली.नियमाप्रमाणे पुरेसा अवधी देऊन जनजागृती करुन ही सभा घेण्याची मागणी गावातली नागरिकांची होती. विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतचे पूर्ण सदस्यही त्यावेळी हजार नव्हते.आणि काही

दिवसांअगोदर कोणतीही दवंडी न पिटता ग्रामपंचायत पांगरी उगले च्या खिडकीवर आणि जयपूर तांड्यावरील हनुमान मंदीरावर नोटीस लावण्यात आली होती.A notice was posted on the Hanuman temple on Tandya.दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच सौ सिमा राजु राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालया समोर घेण्याचे आयोजीत केले होते.सदर सभेत खालील विषय घेण्यात येणार होते.१.पंचायत राज शासन निर्णय परिपत्रक वाचन करणे व माहिती देणे बाबत.

२.म.ग्रा.रो.हमी योजने अंतर्गत विविध योजनेसाठी लाभार्थी निवडणे.३.जलजिवन मिशन परिपत्रक वाचन करणे व माहिती देणे बाबत.४.प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेची वाढीव लाभार्थी यादी सादर करणे तंटामुक्त अध्यक्ष निवड करणे, समितीचे पुनरगठन करणे.५.तंटामुक्त अध्यक्ष निवड करणे.६.शासनाच्या विविध योजनेसाठी लाभार्थी निवड करणे.७.प्रधान मंत्री आवास योजना व रमाई आवास योजना पात्र व अपात्र लाभार्थी ठरविणे.८.अध्यक्ष यांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय.

याप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्याचे ठरवले होते परंतु अध्यक्षांनी तंटामुक्त अध्यक्ष निवडी करतात अर्ज बोलाविण्यात आले त्यावेळी अर्जासाठी वेळ देण्यात आला. काही वेळातच नऊ अर्जदारांनी तंटामुक्त अध्यक्षासाठी अर्ज सादर केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी काही वेळ अर्जदारांना चर्चा करण्यासाठी देण्यात आला, त्याचवेळी गावातून काही लोक आले मग एकच झुंबड

उडाली. त्यावेळी ग्रामपंचायती समोर गर्दी झाली, आंबट वास येण्यास सुरुवात झाली आणि लोकांची ओरड सुरू झाली की आम्हाला आज ग्रामसभा आहे हे माहितीच नाही, आम्हालाही अध्यक्षांसाठी अर्ज सादर करावयाचा होता या गोंधळामुळे आणि ग्रामसभेला पुरेशी गणसंख्या नसल्याने तहकुब करावी लागली. व पुढील ग्रामसभेची तारीख लवकरच कळवण्यात येईल असेही अध्यक्षांकडून सांगण्यात आले.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: There was a big mess and sour smell due to lack of planning by Gram Sevak Sarpanch in Pangri Ugale Gram Sabha!
Published on: 29 August 2022, 02:01 IST