News

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील सासवड इथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. या शेतकरी मेळाव्याला अचानकपणे येण्याची संधी मला मिळाली. हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशात कोणता वर्ग अस्वस्थ आहे हा प्रश्न विचारला तर अनेक लोक पुढे येतात.

Updated on 18 April, 2023 9:23 AM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील सासवड इथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. या शेतकरी मेळाव्याला अचानकपणे येण्याची संधी मला मिळाली. हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशात कोणता वर्ग अस्वस्थ आहे हा प्रश्न विचारला तर अनेक लोक पुढे येतात. पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम आज कशामुळे होतोय आणि देशात आत्महत्येसारख्या संकटामध्ये कोणता वर्ग आहे पाहिले तर शेतकऱ्यांचा विचार पुढे येतो. शेतकरी आज अडचणीत आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये गेलो असता तिथल्या शेतकरी मेळाव्याला भेट दिली. तिथे सोयाबीन, कपाशी तसेच अन्य पीके घेत असताना अवकाळी पाऊस, गारपिट झाली आणि हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. यामुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. निसर्गाचा लहरीपणा तुमच्या-माझ्या हातात नाही. नैसर्गिक संकट आल्यास संकटग्रस्त माणसाला त्यातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी असते. मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या कामाकडे लक्ष दिले नसल्याने शेतकरी आत्महत्या करतोय. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या बळीराजावर आत्महत्या करण्याचे संकट राज्यात आणि देशात ठिकठिकाणी येत आहे, यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही.

नाशिक जिल्ह्यातही गारपिटीने, पावसाने टोमॅटो, द्राक्ष, कांद्यासारखी अनेक पीकं शेतकऱ्यांच्या हातून गेली. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे पंचनामे झाल्याचे सरकारने सांगितले, तरीही तिथे अजूनही मदतीचा पत्ता नाही. अशा संकटग्रस्तांना मदत नाही.

उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज..

दुसऱ्या बाजूला शेतमालाच्या किमती पडल्या आहेत. माल निर्यात करण्याची आवश्यकता आहे. त्यावर बंदी घालण्यात आली. परदेशातून माल याठिकाणी आयात करण्याची परवानगी दिली. त्याचा परिणाम म्हणून शेतीमालाचे अर्थशास्त्र संकटात आले. त्याची पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. त्यामुळे जे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत नाही आणि देशातील बहुसंख्य लोकांच्या हिताची जपणूक करत नाही अशा सरकारला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हा निकाल आपण घेतला पाहिजे. त्यासाठी आपण जागे होण्याची गरज आहे.

त्याशिवाय महागाई, बेकारीचे संकट आहे. तसेच अनेक गोष्टी देशात घडल्या तरी खऱ्या अर्थाने त्यांची वस्तूस्थिती देशासमोर मांडली गेलेली नाही. मध्यंतरी पुलवामा भागात चाळीस जवान शहीद झाले. यामागची गोष्ट जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी समोर आणली. मलिक यांची राज्यपालपदी नियुक्ती भाजपकडून करण्यात आली होती. त्यावेळी जवानांना आवश्यक साधने, विमाने वेळीच पुरवली गेली नसल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. मलिक यांनी देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या हे कानावर घातले तेव्हा याबाबत कुठे बोलू नये, असे सांगण्यात आले.

भाजपचे बडे नेते दिल्लीत आणि अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, चर्चांना उधाण...

देशाच्या जवानांचे रक्षण करण्याची जबाबदारी देशाच्या सरकारवर आहे. ती सुद्धा पार पाडायची नाही अशी भूमिका जे सरकार घेते त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्यासाठी पुढील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आज पुरंदर तालुक्यातील लोकांना भेटता आले. सत्ता हातात नसली, सरकार नसले, तरी तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढू ही खात्री देतो. पुरंदर तालुक्याने मला स्वत:ला अनेकदा देशाच्या संसदेमध्ये पाठवले. देशाचा संरक्षण, शेती खात्याचा मंत्री होण्याची संधी मला मिळाली यात पुरंदर तालुका आणि जनतेचा वाटा मोठा आहे. त्यामुळे हक्काने आम्हाला कोणतीही अडचण सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही निश्चित वापरावा.

सदाभाऊ खोत यांचा गेटवरून उडी घेत पुणे महानगरपालिकेत प्रवेश, शेतकऱ्याचे वाहन जप्त केल्याने आक्रमक..
राज्यतील महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त, शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका
उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज..

English Summary: 'There is no such unfortunate thing as the time to commit suicide on Baliraja'
Published on: 18 April 2023, 09:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)