लसिचा तुटवडा असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आंदोलन-डाॕ.ज्ञानेश्वर टालेसध्या राज्यभरात पशुवर आलेला लम्पी स्किन डिसीज या आजारामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मेहकर व लोणार तालुक्यातील लसिकरणासाठी ब-याच शेतकऱ्यांचे फोन आज आम्हाला आलेत त्यानुषंगाने तातडीने याबाबत आजच जिल्हा पुशुवैध्यकीय अधिकारी श्री
अशोक लोणे तसेच तालुका पशुधन विस्तार अधिकारी श्री हरीष ठाकरे तसेच डोणगांव येथील Ashok Lone and Taluka Livestock Extension Officer Shri Harish Thackeray also from Dongaon पशुधन विकास अधिकारी श्री आस्वार साहेब,यांच्याशी लम्पी स्किन डिसीज,च्या प्रादुर्भाव हा तालुक्यात वाढु नये
हे ही वाचा - पंचनाम्याचे थोटाग बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट हेक्टरी 50 हजार मदत द्या : स्वाभिमानी ची मागणी.
यासाठी आपण तात्काळ पुरेसा लस पुरवठा करावा अन्यथा आम्हाला पशुवैध्यकीय विभाग यांच्या विरोधात आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल.राज्य सरकार एकिकडे म्हणते
की सदर लसीचा पुरेसा पुरवठा उपलब्ध आहे.माञ लोणार व मेहकर तालुक्यात सध्या एकही लस उपलब्ध नसुन लवकरच सदर लस उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन संबंधित विभागातील अधिकारी यांनी सांगितले या लसिकरणासाठी शासनाला तालुक्यातील सर्व खाजगी पदवी/पदविका धारक सहकार्य करण्यासाठी तयार असुन लस उपलब्ध झाल्यास तात्काळ लसिकरण करणे श्यक्य
होईल.मेहकर तालुक्यातील मादणी व डोणगांव येथे फक्त २५० व २५० एकुन पाचशेच लस उपलब्ध झाल्या होत्या त्या संपूर्ण लस संपल्या असुन सामान्य शेतकरी अजुन सुध्दा या लसिकरणासाठी धावपळ करत आहे.माञ संबंधित प्रशासनाने तात्काळ तालुक्यातील लसिकरणासाठी नियोजन करावे असी विंनती वजा आंदोलनाचा इशारा आज स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी दिला.
Published on: 19 September 2022, 05:32 IST