दिवाळी म्हटलं की सर्वांच्या समोर येते ते म्हणजे मिठाई आणि फटाके. जर का फटाके नसतील तर दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही. परंतु वायू प्रदूषनामुळे आणि ध्वनी प्रदूषणामुळे फटाके फोडण्यावर बंदी आहे. परंतु कोणी सुद्धा याचे पालन करत नाहीत.परंतु एका स्वयंसेवी संस्थेने असे फटाके बनवले आहेत ज्या फटाक्यांमधून धूर येत नाही आणि मोठा आवाज सुद्धा नाही येणार. हे ऐकून तुम्हाला वाटेल हे कसले फटाके चला तर जाणून घेऊया या खास फटाक्यांविषयी.
चक्क येतात भाजीपाला वनस्पती :
तसेच बाजारात सुद्धा इको फ्रेंडली फटाके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फटाके उपलब्ध आहेत. परंतु आज आम्ही अश्या फटाक्यांविषयी सांगणार आहे जे फोडल्यावर त्यातून आवाज आणि धूर न बाहेर येता चक्क येतात भाजीपाला वनस्पती. हे ऐकून आचर्य वाटतंय ना?परंतु हे खरं आहे एक का स्वयंसेवी संस्थेने हे फटाके तयार केले आहेत. आणि हे फटाके खरेदी करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. या फटाक्यांना बाजारात ‘सीडबॅाल’ असेही म्हटले जाते.
या फटाक्यांना बाजारात मोठी मागणी:-
स्वयंसेवी संस्थेने असे फटाके बनवले आहेत जे फोडल्यावर जमिनीवर बियांची उधळण होते. आणि त्यातून वनस्पती उगवण्यास मदत होते. या फटाक्यांमध्ये टोमॅटो, गवार, मिरची या बियांची लागण केली आहे तसेच लक्ष्मी बॉम्बमध्ये आपटे आणि भेंडीचे बियाणे असतात. तसेच वेगवेगळ्या फटाक्यांमध्ये मुळा, ज्वारी, पालक, लाल हरभरा, फ्लॅक्स, काकडी, कांदा आणि वांगे या बियांचा समावेश केला आहे.श्वेता भट्ट यांनी हे फटाके बनवले आहेत. त्यांच्या या उपक्रमाला ‘सीडबॉल’ फटाके असे नाव सुद्धा दिले आहे. वाढत्या आधुनिकीकरणामुळे या सिडबॉल फटाक्यांना बाजारात मोठी मागणी आहे तसेच हे फटाके बनवण्यासाठी महिलांची गरज पडते आहे त्यामुळं यातून रोजगार निर्मिती सुद्धा होत आहे.फटाके
फुटल्यावर भाज्या वाढतात:-
हे सिडबॉल फटाके बाजारात विकणाऱ्या फटाक्यांसारखे हुबेहूब दिसतात. या फटाक्यांमध्ये सुद्धा दारू असते. परंतु या फटाक्यांमधील दारुगोळा हा पर्यावरनाल हानी पोहचवत नाही.तर ही दारू पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे हे फटाके फुटल्यावर भाजीपाल्याची किंवा कोणत्याही प्रकारच्या वनस्पती तयार होतात.
फटाक्यांना भाजीची नावे:-
हे फटाके इतर फटाक्यांसारखे हुबेहूब दिसतात परंतु या फटाक्यांची नावे ही वेगवेगळी आहेत. ज्या फटक्यात विविध बिया आहेत त्यानुसार या फटाक्यांची नावे आहेत.
Published on: 07 November 2021, 08:40 IST