नवी दिल्ली
शेतकऱ्यांना आता फळबागेतून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आंबा, पेरु, डाळींब, पपई आणि भाजीपाला लागवड करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. यामुळे उत्पन्न देखील वाढत आहे. फळबाग लागवडीमुळे काही शेतकरी कर्जातून देखील मुक्त झाले आहेत. दिल्लीतील बेगुसराय येथील सांख पंचायतीमध्ये प्रभू शर्मा यांनी मेहनत करून स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवले. पपई आणि हिरव्या भाजीपाल्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
फळबाग लागवडबाबत प्रभू शर्मा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आधी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांना सरकारी मदत मिळाली नाही. तसंच कृषी विभागाकडून देखील मदत किंवा अनुदान मिळाले नाही. त्यामुळे मी शेजाऱ्याकडून खासगी कर्ज घेऊन फळबाग लागवड केली.
शर्मा यांनी त्यांच्या शेतात पपई, भेंडी आणि वांग्याची लागवड केली. सुरुवातीला त्यांना ४० हजार रुपयांचा खर्च आला. परंतु या पिक लागवडीतून त्यांचे उत्पन्न वाढले. तसंच नफा देखील चांगला मिळाला. भाजीपाला हा चांगला व्यवसाय आहे. पण, कधीकधी कीड लागू शकते. त्यामुळे हा धोका स्वीकारून त्यांनी लागवड करण्याचा निर्णय घेतला. तसंच योग्य पद्धतीने कीटकनाशकांचा वापर पिकाला केला तर रोगापासून बचाव करता येतो, असंही ते सांगतात.
पुढे शर्मा म्हणाले की, शर्मा यांना पपई विक्रीतून १ लाख ८० हजार रुपये मिळाले. भाजीपाला विकून ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. एक गुंठा जमिनीतून त्यांनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. आता दुसरे शेतकरी त्यांच्याकडून आधुनिक शेतीच्या टिप्स घेत आहेत.
Published on: 25 August 2023, 04:29 IST