भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. भारत हा विविधतेने नटलेला एक देश आहे. आपल्या देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. यामध्ये बरीचशी तरुण सुशिक्षित तरुण पिढी शेती करताना बघायला मिळतात. सध्या विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे त्यामुळे अनेक कामे अगदी सहजने होऊन जातात, तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरण खूप गरजेचे आहे.
प्रामुख्याने आपल्या देशात खरीप आणि रब्बी हे दोनच हंगाम असतात. सध्या खरीप हंगामाचा काळ आहे. त्यामुळे शेतामध्ये आता सोयाबीन, मूग यांसारखी पिके असतात. पेरणीच्या काळात समधानकारक पाऊस झाला परंतु नंतर पावसाने पूर्णपणे दडीच मारली. ऐन पीक काढणीच्या वेळी पाऊस न पडल्यामुळे पिके रानात सुकून गेली याचा तोटा शेतकरी वर्गाला झाला.
हेही वाचा:-घ्या जाणून जीप कंपास च्या नवीन इडिशन चे फीचर्स, किमतीमध्ये केली मोठ्या प्रमाणात वाढ...
पावसाअभावी पिके रानात जळून गेली:-
यंदा ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या सहा तालुक्यांतील एकूण ८ मंडलांमध्ये २१ हून अधिक दिवस पावसाचा खंड पडला. परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनात मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५२ ते ५७ टक्के घट अपेक्षित आहे. शिवाय भाव सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. पाऊस वेळेवर पडला नसल्यामुळे पिके रानात जळून गेली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा दुःखात आहे.
सोयाबीन उत्पादकता स्थिती (प्रतिहेक्टरी क्विंटलमध्ये)
मंडल सरासरी उत्पादन यंदाचे अपेक्षित उत्पादन उत्पादन घट (टक्के)
झरी ९.८१ ४.७० ५२
सिंगणापूर ९.११ ४.२८ ५३,जांब १०.१४ ४.७६ ५३, दूधगाव ८.४० ३.७८ ५५,रामपुरी बुद्रूक ८.५० ३.९९ ५३,सोनपेठ ६.६२ ३.०४ ५४,माखणी ७.६० ३.४९ ५४,चुडावा ८.६७ ३.७५ ५७ शिवाय उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीन च्या उत्पादनात सुद्धा घट झाली असल्याने किमती सुद्धा वाध्ट्याल.
Published on: 12 September 2022, 03:48 IST