गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. असे असताना आता देखील विजतोडणी सुरूच आहे. आता राज्य सरकराने ‘कृषिपंप’ ऊर्जा धोरण 2020 हे जाहीर केले असून शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यामधून पैसे वसूल होणारच आहेत, मात्र त्या पैशातून विकास कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यासाठी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजाकसत्ताक कार्यक्रमात अनेक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन लोकप्रतिनीधी यांनी करावे असे पत्र ग्रामपंचायत दिले आहे. यामुळे यामध्ये सहभाग वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
असे असताना आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोठे वक्तव्य केले आहे. ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० जाहीर केलेले आहे. यामुळे आता कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत आहे. थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
सध्या महावितरणने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांनी नियमितपणे वीज बिल भरावे यासाठी आता नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी शहरात विविध ठिकाणी भेट देऊन थकबाकी वसुली मोहिमेचा आढावा घेतला. या मोहिमेअंतर्गत थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महावितरणची आर्थिकस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीची मोहीम सर्वत्र जोरात सुरू आहे. राज्य सरकार अनेक सवलती देत असले तरी अजूनही वसुलीची मोहीम सुरूच आहे. सध्या परिस्थिती ठीक आहे, मात्र जर उन्हाळ्यात अशी कारवाई होतच राहिली तर मात्र अजून मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. यामुळे आता ही कारवाई थांबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. विरोधक देखील यामुळे आक्रमक झाले आहेत.
Published on: 28 January 2022, 12:01 IST