News

विदर्भातील काही भागात कडाक्याची थंडी वाढली असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापामानाची नोंद झाली. कोरडे हवामान आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागात थंडी वाढली आहे.

Updated on 30 December, 2020 1:38 PM IST

 

विदर्भातील काही भागात कडाक्याची थंडी वाढली असून शनिवारी  सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापामानाची नोंद झाली. कोरडे हवामान आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागात थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील काही भागात कडाक्याची थंडी वाढली आहे. उत्तर भारतातील जम्मू- काश्मीर आणि लडाख व परिसरात तसेच उत्तर पाकिस्तानच्या परिसरात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. यामुळे उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तरप्रदेश, राजस्थान या भागात कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे.

 सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअस पर्यत घट झाली आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातील चुरू येथे ०.१ अंश सेल्सिअसची देशातील सर्वात कमी तापमान नोंदविले गेले. दरम्यान राज्यातही उत्तरेलकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा वाहू लागले आहेत. त्यामुळे  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, व विदर्भातील काही भागात चांगलाच गारठा वाढला असून किमान तापमान सरासरीच्या तुलुनेत  पाच अंश सेल्सिअस पर्यंत घट होत आहे. राज्यातील पुढील काही दिवस कोरडे हवामान राहणारे आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्याती काही भागात थंडी वाढेल. किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे.

 

या लाटेचे प्रवाह मध्य महारा।ष्ट्र, मराठवाडा विदर्भाच्या दिशेने वाहत आहे.यामुळे राज्यातही काही प्रमाणात कडाक्याची थंडी वाढली आहे. किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे.विदर्भातील काही भागात कडाक्याची थंडी वाढली आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे ७ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे पहाटे चांगलीच थंडी वाढत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात ऊब मिळवण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.राज्यात दिवसभर ऊन पडत असले तरी ते ऊन उबदार वाटत आहे.सायंकाळनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात होत आहे. मध्यरात्रीनंतर थंडी वाढत जाऊन पहाटे चांगलीच थंडी वाढत आहे. थंडीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा  व विदर्भातील काही मध्य रात्रीनंतर थंडी वाढत आहे.

English Summary: The weather in the state will remain dry and cold
Published on: 21 December 2020, 09:53 IST