News

शेती व्यवसाय सुधारावा म्हणून केंद्र सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या नवीन योजना काढत असते जे की आता शेतामध्ये ड्रोन चा वापर वापर करण्यावर केंद्र सरकार लक्ष देत आहे तसेच सरकारने जे डिजिटल कृषी मिशन योजना जी काढलेली आहे.वर सुदधा लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढवणे तसेच त्यांना अनेक प्रकारचे फायदे करून देणे असा उद्देश केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलेला आहे.

Updated on 02 October, 2021 7:23 AM IST

शेती व्यवसाय सुधारावा म्हणून केंद्र सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या नवीन योजना काढत असते जे की आता शेतामध्ये ड्रोन चा वापर वापर करण्यावर केंद्र सरकार लक्ष देत आहे तसेच सरकारने जे डिजिटल कृषी मिशन योजना जी काढलेली आहे.वर सुदधा लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढवणे तसेच त्यांना अनेक प्रकारचे फायदे करून देणे असा उद्देश केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलेला आहे.

७० टक्के पीक सरंक्षण:

कालच्या गुरुवारी क्रॉपलाइफ इंडियाचा ४१ वा वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोकन केले गेले होते त्यामध्ये नरेंद्रसिंह तोमर यांनी अॅग्रोकेमिकल सेक्टरचा प्रवास या विषयावर मार्गदर्शन केले. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की CLI संयुक्तपणे ७० टक्के पीक सरंक्षण करते तर ९५ टक्के रेणू देशात आणण्यात CLI ची भूमिका आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर CLI  सदस्य  कंपन्या  करत आहेत तसेच जवळपास ६ अब्ज डॉलर खर्च जागतिक विकास संशोधनावर आणि विकासावर करते.

हेही वाचा:हर्बल शेती करून महिन्याला मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

कृषी रसायनांच्या उत्पादनात भारत देश चार नंबरवर:-

कृषी रसायनांच्या उत्पादनात भारत देश हा जगात चार नंबर चा देश आहे. या गोष्टीचा अंदाज घेत सरकारने कृषी रासायनिक  क्षेत्राचा आवखा  वाढवला आहे त्यामुळे जागतिक पुरवठा मध्ये भारत देश आपली महत्वाची भूमिका बजावू शकणार आहे.नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की कोरोना हे  जगावर आलेले अभूतपूर्व  संकट आहे  आणि अशा  कठीण  परिस्थितीत सुद्धा  जी सरकारने घेतलेली भूमिका आहे त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थाला मोठी चालना मिळालेली आहे.कोरोना ने संकटे देऊन अनेक प्रयोग करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची चालना दिलेली आहे. या संकटात शेतकरी वर्गाने मागे न सरता पीक उत्पादन काढले आणि जगाला जगवले आहे.

कृषी सुधारणांचा फायदा होईल:-

कृषी सुधारण्यासाठी जे कायदे केले आहेत त्याचा फायदा तर शेतकरी वर्गाला होणारच आहे. शेतकऱ्यांना वाटेल त्या ठिकाणी आपली उत्पादने विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. कंत्राटी शेती या नवीन कायद्याने सुद्धा कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागून शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे.कोरोनाच्या संकटामुळे अनेक असे देश आहेत जे विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अनेक उपक्रम  सुद्धा  राबवत आहेत आणि याच भारताला  सुद्धा खूप  मोठा फायदा होणार आहे. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की चांगली शेती केल्याने कार्यक्षमता तर वाढेलच आणि चांगल्या प्रमाणत फायदा सुद्धा होईल आणि याच फायदा भारताच्या विकासाला होणार आहे.

English Summary: The use of drones will boost agriculture business: Union Agriculture Minister Narendra Singh Tomar
Published on: 02 October 2021, 07:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)