राज्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरण निवळत असून आता कुठेतरी बळीराजाने मोकळा श्वास सोडला होता. मात्र बळीराजाच्या संकटात नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात अजून भर पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (By the Indian Meteorological Department) वर्तवली आहे. सध्या राज्यातील वातावरण निवळले असून थंडीचा जोर कायम आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत (In the capital of Maharashtra) सकाळी आणि सायंकाळी सौम्य थंडीचा आभास मुंबईकरांना आनंदी करत आहे.
तसेच राज्यातील उत्तर भागात आणि मराठवाडा (Marathwada) समवेतच विदर्भात (In Vidarbha) अद्यापही वातावरण निवळले नसून या प्रदेशात दाट धुक्याची चादर बघायला मिळत आहे शिवाय येथे कडाक्याच्या थंडीचा देखील प्रकोप कायम आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने सध्या राज्यात तयार झालेले वातावरण 2 फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार असल्याचे वर्तवले आहे. 2 फेब्रुवारी नंतर पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणा बघायला मिळणार असून 3 तारखेला वातावरण ढगाळ (Cloudy) राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तसेच या काळात पावसाची देखील शक्यता सांगण्यात आली आहे. यामुळे बळीराजाच्या घटत्या चिंतेत पुन्हा एकदा नव्याने वाढ होणार आहे.
आता कुठे रब्बी हंगामातील पिके (Rabi season crops) नव्याने दर्जेदार वाढीसाठी सज्ज झाली होती तर मध्येच अजून आगामी काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला गेल्याने प्रति हंगामावरील ग्रहण अजून टळल्याचे बघायला मिळत नाहीये. पुढील काही दिवस राज्याला कडाक्याच्या थंडीतुन मुक्तता मिळणार नसल्याचे संकेत हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) देण्यात आले आहेत.
मात्र असे असले तरी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होणार असून आगामी काही दिवसात अपेक्षित पावसामुळे राज्यातील प्रदूषित हवा स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याचा दावा हवामान विभागाकडून करण्यात आला आहे. असे असले तरी हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अंदाजामुळे बळीराजाच्या मनात धाकधुक वाढली असून रब्बी हंगामातील पिकांवर याचा किती विपरीत परिणाम होतो हे बघण्यासारखे असेल.
Published on: 30 January 2022, 11:41 IST