स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा आज सकाळ पासून जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झाली आहे. मराठा आरक्षणास पाठींबा देण्यासाठी ही आक्रोश पदयात्रा खंडीत करण्यात आली होती.
काल मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सूरु केलेले उपोषण मागे घेतले. या उपोषणास पाठींबा म्हणून राजू शेट्टी यांनी २२ दिवसाची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती. त्या पदयात्रेस आज सकाळी राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथून सुरवात झाली आहे.
आक्रोश पदयात्रा आज पुन्हा सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या यात्रेने जवळपास ३५० किलोमीटरचे अंतर पार केले असून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आक्रोश पदयात्रा पोहचली होती. आतापर्यंत या पदयात्रेचा शिरोळ, इचलकरंजी, कागल, गारगोटी, भुदरगड-राधानगरी-करवीर- पन्हाळा-शाहूवाडी , शिराळा इस्लामपूर असा प्रवास झाला आहे.
Published on: 03 November 2023, 11:19 IST