राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढत राज्य सरकारने मोफत दूध पावडर देण्याचा निर्णय घेतला आहे. अमृत आहार योजेनेंतर्गत राज्यातील तब्बल पाणवे आठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भूकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दररोज दहा लाख लीटर दुधाचे रुपांतर भुकटीत करण्याचा योजनेला सुद्धा आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यात दूध दरवाढीवरुन राजकरण तापले आहे. दुधाच्या दरवाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी नुकतेच आंदोलन केले होते. यावर उपाय काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतीखाली बुधवारी बैठक बोलविण्यात आली. या बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव संजय कुमार,
बैठकीत दूध दराच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात मोठ्या प्रमाणावर दूध भुकटी शिल्लक आहे. या शिल्लक भुकटीचा प्रश्न मार्गी लावल्यास दूध दराचा मुद्दा निकाली निघेल असा सूर बैठकीत व्यक्त झाला. याआधीच्या दोन बैठकांमध्ये अमृत आहार योजनेअंतर्गत लहान बालके आणि स्तनदा माता, गरोदर महिलांना दूध भुकटी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. सध्या बाजारात भुकटीचे दर घसरले आहेत. नुकसान सोसून भुकटीची विक्री करण्याऐवजी योजनेअंतर्गत भुकटी मोफत दिल्यास योग्य होईल असे मत मांडण्यात आले. त्यानुसार दूध भुकटी पॅकिग करुन अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमृत आहार योजनेअंतर्गत इतर आहारांसोबत दूध भुकटी मोफत दिली जाणार आहे.
Published on: 06 August 2020, 01:58 IST